4 May 2024 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण द्यायला साडेचार वर्षे का लागली? खासदार आनंद अडसुळ

नवी दिल्ली : देशातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारला साडेचार वर्षे का लागली? असा प्रश्न शिवसेना खासदार आनंद अडसुळ यांनी उपस्थित करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात धनगड आणि धनगर असा शब्द बदलला तरी सुद्धा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही असं सुद्धा त्यांनी लोकसभेत विचारलं.

दरम्यान, मोदी सरकारने उचललेलं पाऊल चांगलं असल्याचा दाखल देत ‘साडेचार वर्षे का लागली’ असा अडचणीत आणणारा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात हे विधेयक अडचणीचं ठरू शकतं असं सुद्धा आनंद अडसुळ यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकसभेत बोलताना आनंद अडसूळ म्हणाले की, नोटाबंदीचा फटका छोट्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर बसला, अनेक लघू उद्योग बंद पडले. तसेच मोठा नोकरदार वर्ग बेरोजगार झाला. इतकंच नाही तर सगळा फटका बसलेला असताना त्यात जीएसटी सुद्धा लागू झाला. त्याचा सुद्धा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. मग आता या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तेव्हाच आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न त्यांनी थेट लोकसभेत मोदी सरकारला विचारला आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x