Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरमधून गुंतवणूकदारांनी केली मजबूत कमाई | तज्ज्ञाकडून खरेदीचा सल्ला

Multibagger Stocks | व्हीआरएल लॉजिस्टिक्स अलिकडच्या काळात 2.22% वाढीसह 629.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्यावेळी व्हीआरएल लॉजिस्टिकचे शेअर्स 616.05 रुपयांवर बंद झाले होते. गेल्या पाच सत्रांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 1.61 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र दुसरीकडे गेल्या एका आठवड्यात कंपनीचे शेअर्स 3.55 टक्क्यांनी खाली आले आहेत.
आर्थिक तिमाही निकाल :
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 671.7492 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल १७७५.७८ कोटी रुपयांवरून २४१०.४६ कोटी रुपयांवर गेला आहे. म्हणजेच गेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी चांगले गेले.
शेअरची टार्गेट प्राईस :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआरएल लॉजिस्टिक्स आणि रत्ना सिमेंट यांच्यातील सामंजस्य करारावर जुलैपर्यंत स्वाक्षऱ्या होऊ शकतात. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा सकारात्मक दिसत आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्सने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९१ शाखा उघडल्या. त्याचबरोबर कंपनी या आर्थिक वर्षात 100 नव्या शाखा उघडू शकते. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही आमचे खरेदी रेटिंग प्रति शेअर ७२० रुपये या टार्गेट प्राइसवर ठेवतो.
मल्टी-बॅगर स्टॉकमधून गुंतवणूकदारांना भरपूर नफा :
व्हीआरएल लॉजिस्टिक्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. ३१ मे २०२१ पर्यंत कंपनीच्या एका शेअरची किंमत २५७.५० रुपये होती. ती वाढून ३१ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी ६२९.७० रुपये झाली. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 143.22% ची तेजी पाहायला मिळाली आहे. जर आपण या वर्षाबद्दल म्हणजे 2022 बद्दल बोललो तर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 41.75% वाढ झाली आहे. २१ एप्रिल २०२२ रोजी एनएसईवरील समभागाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत ६५८.७० रुपये झाली होती.
संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निव्वळ नफा १६०.११ कोटी :
३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा किंवा पीएटी (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) ५६.१८ रुपये होता. त्याचबरोबर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निव्वळ नफा १६०.११ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत ईबीआयटीडीए मार्जिन 19.71% राहिले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stocks of VRL Logistics Share Price with a buy call from brokers check details 31 May 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL