27 April 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
x

आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले

रत्नागिरी : शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि अति गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

दम्यान, मुलाखतीत आरोप करताना निलेश राणे म्हणाले, ‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना नेहमीच एक मर्यादा पाळली होती. आम्ही याआधी बाळासाहेब ठाकरेंवर केव्हाही आरोप केले नव्हते. आमच्या राणेसाहेबांचं आज सुद्धा बाळासाहेबांवर प्रेम होतं, परंतु स्वतः ते कधीच व्यक्त करु शकले नाहीत. मी त्यांना राणे साहेब बोलत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला सुद्धा बाळासाहेबांची खरी परिस्थिती सगळ्यांना सांगावीच लागेल.

ठाण्यातील तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते धर्मवीर आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू इस्पितळात झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र हे २ शिवसैनिकांना अजिबात सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा देखील आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी काय दाबली गेली? असे अनेक सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे. तसेच मी स्वतः आजपर्यंत खूप मर्यादा ठेवल्या होत्या परंतु, जर राणेसाहेबांवर कोणी खालच्या पातळीचे माणून आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल आपण हे सहन करणार नाही असे सुद्धा त्यांनी ठणकावले. कारण माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली, परंतु विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती अजिबात पाळली नाही असे निलेश राणे म्हणाले.

तसेच बाळासाहेबांना बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला देखील ठार करायचे होतं. तसे अनेक वेळा प्रयत्न सुद्धा झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे तुम्ही मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व जाहीरपणे सांगेन. त्यामुळे आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x