7 May 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शिवसैनिक प्रचंड संतापल्याचं चित्रं | भाजपचे बोलबच्चन नेते शांत | शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता

Eknath Shinde

Eknath Shinde | बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख, आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात होते. हा प्रसंग निर्माण झालाय किंवा निर्णाम करण्यात आला आहे. यामागे भाजपचं षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होतं. तर तो प्रकार या लोकांनी सुरु केला आहे. आमच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेलं नसतं. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत आणि खूनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे.

आमदारांच्या जीवाला धोका :
काही आमदारांनी कळवलं आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. इथे आमचा खूनही होऊ शकतो. असं वातावरण का निर्माण केलं जातंय, मला कळत नाही. पण या सगळ्यातून शिवसेना बाहेर पडेल. शिवसेनेचं संघटन पुन्हा एकदा यातून उभं राहिलं. कोणी कितीही म्हणत असलं तरी संघटनेला तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे. अनेक आमदारांनी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधला.”, असं राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा बंड मोडून काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तसे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.

मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सुरतला :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यावर शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते सुरतला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यासाठी त्यांच्याकडे निरोप दिला आहे. हा निरोप नेमका काय आहे, शिंदे माघार घेणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार :
शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. ते रिलॅक्स मुडमध्ये सुरतमधील ‘ली मेरेडियन’ या हॉटेलमध्ये पुढचे निर्णय घेत आहेत. आता शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक पोहचण्यापुर्वीच ते दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिवसेनेतील डॅमेज कंट्रोल अपुर्ण राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in anti Shivsena action mode check details 21 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या