8 May 2025 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Eknath Shinde | स्व.बाळासाहेब, शिवसेना आणि धनुष्यबाण बाजूला केल्यास शिंदेही पराभूत होतील याची खात्री असल्याने गट स्थापन?

Eknath Shinde

Eknath Shinde | आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र शिंदेंच्या या राजकारणाचं सत्य काय आहे ते समजणं महत्वाचं आहे.

शिंदे राज्याचा चेहरा नाहीत आणि लोकांना हवस व्यक्तिमत्व नाहीत :
कितीही नाकारलं तरी प्रति शिवसेना म्हणून काम करताना आणि यश संपादन करण्यासाठी एक नेतृत्व लागते. तसेच संबंधित नेतृत्व हे सामान्य लोकांच्या आवडीचे आणि भावनिक साद घालणारे असावे लागते. एकनाथ शिंदे या कोणत्याच गणितात बसत नाहीत. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. याची संपूर्ण जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे, अन्यथा त्यांची राजकीय व्यवस्था सुद्धा नारायण राणे यांच्या पक्षासारखीच होईल. त्यामुळेच त्यांच्याकडेही फडणवीस सांगतील तसं करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.

धनुष्य बाण गेल्यास शिंदेही पराभूत होतील :
एकनाथ शिंदे यांची ओळख ही गटातटाचे राजकारण करणारा नेता अशीच आहे. हे राज्यातील एखादा दिग्गज नेता किंवा सामान्य लोकांना हवा असणारा चेहरा अशी त्यांची मतदारांपुढे ओळख अजिबात नाही. तसे पारंपारिकरित्या ज्या चिन्हावर आपण निवडून आलो, त्याला वगळून इतर चिन्हांवर निवडून येणे कठीण असते हे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनाही ठावूक आहे आहे. लोकांमध्ये या आमदारांची निवडणुकीतील ओळख धनुष्यबाण अशीच आहे. म्हणजे अगदी कमळाच्या चिन्हावर जरी उद्या हे उभे राहिले तरी अनेकजण पराभूत होतील. कारण कितीही नाकारलं तरी त्याची थेट ओळख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाते. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला आणि धनुष्यबानाला चिटकून राहणं हा देखील फडणवीसांचा प्लान आहे. अन्यथा या सर्वांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश देणे फडणवीस यांना सहज शक्य होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde Group will support BJP to form a government check details 22 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या