नवी दिल्ली : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य शिवस्मारक. परंतु, आता त्याच शिवस्मारकाचे काम थांबवण्यात यावे असे थेट आदेश महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
त्यामुळे सदर स्मारक कायद्याच्या कचाट्यात अडकले असून त्याला अजून विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे २ दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर तोंडी आदेश दिले होते. कारण या प्रकल्पामुळे नियोजित जागेवरील जलचर तसेच जैवविविधतेला मोठा धोका आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यामुळे तूर्तास हा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.
