4 May 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

अनिल देशमुखांचे खासगी सचिव अटकेत | पण शिंदेंच्या बंडापूर्वी त्यांच्या खासगी सचिवांना केंद्रीय एजन्सी का शोधत होत्या?

Sachin Joshi

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड पुकारलं २१ जून रोजी. शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड करत एकनाथ शिंदे यांनी ३५ हून जास्त आमदार फोडले. या सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचलेत. आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बंड मानलं जातं आहे.

शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी सिनेमा :
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. या बंडाची सुरूवात दोन वर्षांपासून सुरू होती हे आता नाराज शिवसैनिकांकडूनच कळतं आहे. या सगळ्यात आणखी एक चर्चा होते आहे ती म्हणजे धर्मवीर सिनेमाची. हा सिनेमा एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवण्यासाठी आणला गेला का? या सिनेमाची चर्चा सोशल मीडियावरही तेवढीच रंगली होती.

शिंदेंचे खासगी सचिव सचिन जोशी :
शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर जेमतेम महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीत ठाण्यातील ‘टिम शिंदे’आणि त्यातही शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी यांनी बजावलेली ‘कामगिरी’ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या डोळ्यात भरणारी होती. या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट आणि मंगेश देसाई यांच्या मार्फत करण्यात आलेली असली तरी या प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी यांची भूमिका महत्वाची होती, अशी चर्चा आहे.

मंत्रालयातील विभागांच्या बैठकांना जोशी यांची थेट उपस्थिती :
भाजपने चर्चा वरुण सदेसाईंची केली होती, मात्र राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता येताच शिंदे यांच्याकडे असलेल्या विभागांच्या अनेक बैठकांना जोशी यांची थेट उपस्थिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आश्चर्यकारक असायची.

मंत्रालय कामकाजातील महत्व कमालीचे वाढले :
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सचिन जोशी यांचे मंत्रालय कामकाजातील महत्व कमालीचे वाढल्याचे स्पष्ट दिसत होते. शिंदे यांचे प्रशासकीय सचिव म्हणून बालाजी खतगावकर यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असली तरी प्रशासकीय नियुक्त्या, शिंदे यांची स्थानिक राजकारणातील आर्थिक गणिते, राजकीय आखणीला मूर्त स्वरुप देण्यात सचिन जोशी यांची भूमिका निर्णायक ठरु लागली होती.

धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर जोशी ‘नाॅट रिचेबल’ :
धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर सव्वामहिना जोशी ‘नाॅट रिचेबल’ झाले. कारण केंद्रीय तपास यंत्रणांचे त्यांच्यावर लक्ष असल्याच्या चर्चाही अगदी जोमात सुरु झाल्या होत्या. शिंदे यांचे सुरतेतील बंड आणि पुढे गुवहाटीपर्यंतचा प्रवास सुरु होताच जोशी यांच्या मागील महिनाभरापासून ‘गायब’होण्यामागील अर्थ आता अनेकांना उलगडू लागला आहे. अर्थात इतके सगळे सुरु असतानाही जोशी मात्र अद्याप अनेकांसाठी नॉट रिचेबल आहेत देखील खरं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sachin Joshi Private Secretary of Eknath Shinde check details 24 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)#Sachin Joshi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या