4 May 2025 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

शिंदेंचं 'रिक्षाच्या आडून' स्वतःसाठी राजकीय मार्केटिंग | वास्तविक शिवसेनेच्या कृपेने आज 'आलिशान आयुष्य जगतात'

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | २१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत २९ आमदारांना घेऊन उठाव केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत न जाता आपण आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत गेलं पाहिजे ही या सगळ्यांची मुख्य मागणी होती. २१ जूननंतरच्या पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे आणखी १० तर अपक्ष १२ आमदार येऊन मिळाले. त्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं त्यानंतर पडलं.

या राजकीय घडामोडी घडल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर आता एक ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी उद्धव ठाकरे जे मर्सिडिज चालवत जायचे त्याचा संदर्भ दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं :
“रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” हे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे त्यांच्यासह आलेल्या आमदारांना घेऊन जेव्हा गुवाहाटीत होते तेव्हा रिक्षावाला म्हणून त्यांना हिणवलं गेलं होतं. तसंच संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी तसंच इतर आमदारांविषयी अपशब्द वापरले होते. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

शिंदेंचं वास्तव काय ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ‘रिक्षाच्या आडून’ स्वतःचं राजकीय मार्केटिंग करत असले तरी एकनाथ शिंदे हे स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आंनद दिघे यांचं नाव पुढे करून मोठं शाही आयुष्य जगतात हे वास्तव आहे. त्यांनी शिवसेनेत मिळालं सगळं उघड्या डोळ्याने दिसतं हे देखील वास्तव आहे. मात्र आज ते ठाकरेंना बदनाम करण्यासाठी आणि स्वतःला सामान्य भासविण्यासाठी मोठं मार्केटिंग करत असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीत असताना स्वतःकडे असलेल्या खात्याच्या विकास कामांचा आढावा देखील ते अशाच खाजगी आलिशान गाड्यातून घ्यायचे. त्याचा प्रत्यय समृद्धी महामार्गाच्या पाहणीत लोकांनी उघड्या डोळ्याने पहिला होता. त्याचे खालील व्हिडिओ पुरावे देखील उपलब्ध आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde enjoyed a royal life in real life because of Shivsena check details 06 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या