3 May 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Dividend Stock | गुंतवणूकदारांची चांदी झाली, या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 200 रुपये लाभांश, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Dividend stock

Dividend Stock | शेअर बाजारात पडझड आणि अस्थिरतेचे वातावरण असताना बाजारात अश्या काही कंपन्या आहेत ज्या लाभांश जाहीर करत आहेत. अश्या कंपनी मुळे गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा होत आहे. अशीच एक कंपनी आहे, यमुना सिंडिकेट लिमिटेड. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे बाजार भांडवल 365.80 कोटी रुपये आहे.

स्मॉल कॅप कंपनी :
मागील काही तिमाहीत अनेक कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर केला होता. आता या यादीत यमुना सिंडिकेट लिमिटेडही सामील झाली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल सुमारे 365.80 कोटी रुपये आहे.

रेकॉर्ड डेट काय आहे?
यमुना सिंडिकेट लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, “31 मार्च 2022 रोजी, संचालक मंडळाने प्रति शेअर 200 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, त्यानुसार एजीएममधील घोषणेनंतर पात्र गुंतवणूकारांना लाभांश दिले जाईल. 18 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणार्‍या गुंतवणूकदारांना कंपनी 200% लाभांश देणार आहे. 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान पात्र गुंतवणूकदारांना कंपनीद्वारे लाभांश दिले जाईल. व्हॅल्यू रिसर्च डेटानुसार, यमुना सिंडिकेट बँक ही कर्जमुक्त कंपनी असून कंपनीच्या प्रमोटरकडे कंपनीच्या मालकी हक्कात 74.87% हिस्सा आहे.

स्टॉकची कामगिरी :
गेल्या 6 महिन्यांच्या आकडेवारीचे निरीक्षण केले तर आपल्याला कळेल की BSE वर कंपनीचे शेअर 16.87% खाली आले होते. मागील वर्ष हा गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक होता. या दरम्यान यमुना सिंडिकेट लिमिटेडचे ​​शेअर्स 39.28% घसरले होते. 28 जून ते 28 जुलै दरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये 1.64% पडझड झाली होती. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक प्रती शेअर 20,499 रुपये आहे. तर 52 आठवड्याचा नीचांक प्रती शेअर 11,650.05 रुपये आहे.

कंपनी चा व्यापार :
कंपनी ट्रेडिंग आणि मार्केटिंग व्यापराशी संबंधित व्यवसाय करत आहे. 1955 साली कंपनीची स्थापना यमुना नगर, हरियाणा येथे झाली. कंपनी 1957 पासून या उद्योगात आहे. सध्या कंपनीच्या शाखा उत्तर भारतात उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये पसरला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dividend Stock Yamuna Sindicate Share Price declared dividend on 29 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या