30 April 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Pension Money | तुमच्या घरातील वृद्धांना महिना 3,000 रुपये पेंशन हवी आहे?, मग या योजनेचा लाभ उचला

Pension Money

Pension Money | केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी पीएम-किसान सन्मान निधी योजना आणि पीएम श्रम योगी मानधन योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ही शेतकरी आणि कामगारांसाठी पेन्शन योजना आहे. याअंतर्गत लाभार्थ्याला ६० वर्षांनंतर वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याअंतर्गत शेतकरी कोणत्याही कागदपत्रांशिवाय थेट पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत स्वत: ची नोंदणी करू शकतात.

काय आहे पीएम श्रम योगी मानधन योजना, कसा लाभ घेता येईल :
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून वृद्धापकाळात जगण्यासाठी पेन्शन देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मे २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.

दरमहा प्रीमियम जमा करावा लागतो :
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणीचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याला दरमहा प्रीमियम जमा करावा लागणार आहे. १८ वर्षे वय असलेल्या शेतकऱ्याला दरमहा ५५ रुपये, तर ४० वर्षे वय असलेल्या शेतकऱ्याला २०० रुपये प्रीमियम जमा करावा लागणार आहे. यामध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. या योजनेअंतर्गत ५० टक्के प्रिमियम शेतकरी भरतो आणि उर्वरित ५० टक्के प्रिमियम सरकार भरतो. या योजनेअंतर्गत, जीवन विमा महामंडळ नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.

नोंदणी कशी करावी :
जर तुम्ही शेतकरी असाल आणि पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. पेन्शन योजनेसाठी दरमहा भरलेला प्रीमियमही सन्मान निधीअंतर्गत सरकारी मदतीतून कापला जाणार आहे.

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्रात (सीएससी) जाऊन नोंदणी करू शकता. किसान मानधान योजनेच्या https://maandhan.in/sramyogi वेबसाइटवर जाऊनही तुम्ही स्वत:ची नोंदणी करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pension Money from Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana check details 08 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pension Money(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या