8 May 2025 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | या स्टॉकच्या गुंतवणूदारांना 230 टक्के परतावा मिळाला, पण गुंतवणूकदार पुढेही मालामाल होणार

Multibagger stock, Adani power

Multibagger Stocks | अदानी पॉवरच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना या चालू वर्षात आतापर्यंत 230 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी भागधारकांना मागील 5 वर्षात 1100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला होता. जून 2022 च्या तिमाहीत अदानी कंपनीचा नफा तब्बल 16 पट वाढल्याची नोंद झाली आहे.

अदानी ग्रुपच्या या मल्टी बॅगर कंपनीच्या शेअर्सने चालू वर्षात आतापर्यंत भरघोस परतावा दिला. अदानी समूहाच्या ह्या कंपनीचे नाव आहे अदानी पॉवर. कंपनीच्या शेअर्सनी या वर्षात आतापर्यंत भागधारकांना 230 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांच्या काळात 1100 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला होता. अदानी पॉवरने जून 2022 च्या तिमाहीत प्रचंड मोठा नफा कमावला असल्याचे जाहीर केले. अदानी पॉवरच्या नफ्यात तब्बल 16 पट वाढ झाली असून निव्वळ नफा 4,780 कोटी रुपयेपर्यंत पोहोचला आहे.

100 रुपये वरून गेला 300 रुपयेवर :
अदानी पॉवरच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत जवळपास 235 टक्के परतावा दिला हे आपण पाहिले, आता त्याची किंमत आपण पाहू. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी अदानी पॉवरचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 101.30 रुपयांना ट्रेड करत होते. 10 ऑगस्ट 2022 रोजी BSE वर अदानी पॉवरचे शेअर्स 340 रुपये च्या पातळीवर जाऊन पोहोचले. अदानी पॉवरच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या भागधारकांना जवळपास 19 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

5 वर्षांत 1140 टक्के परतावा :
अदानी पॉवरच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या भागधारकांना 1140 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला होता. 11 ऑगस्ट 2017 रोजी अदानी पॉवरचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर फक्त 27.35 रुपयेवर ट्रेड करत होते. 10 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवरचे शेअर्स 340 रुपयांवर जाऊन पोहोचले. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 12.43 लाख रुपये झाली असती.

नफ्यात 1619 टक्क्यांची वाढ :
अदानी पॉवर कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत 4780 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीच्या नफ्यात 1619 टक्क्यांनी वाढ झाली होती. अदानी पॉवर कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीत 278 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.अदानी पॉवरचे एकूण वार्षिक उत्पन्न वाढून 15,509 कोटी रुपये पर्यंत पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत फक्त 7213.21 कोटी रुपये होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Adani power share price return on 11 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या