6 May 2025 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Multibagger Stocks | गुंतवणूकदार दीड वर्षात झाले मालामाल, या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 49 लाख रुपयाचा परतावा दिला

Multibagger Stock, EKI energy services

Multibagger Stocks | आपण अश्या एका कंपनी ची माहिती घेणार आहोत की कन्सल्टिंग सर्व्हिसेसशी संबंधित आहे. या कंपनीने आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील दीड वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या भागधारकांना लखपती केले आहे.

शेअर्स मध्ये कमालीची वाढ :
कन्सल्टिंग सर्व्हिसेसशी संबंधित या कंपनीच्या शेअर्स मध्ये कमालीची वाढ झाली आहे. ही कंपनी आहे EKI एनर्जी सर्व्हिसेस. या कंपनीच्या शेअर्सने मागील दीड वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीनं आपला आयपीओ गेल्या वर्षी आणला होता. कंपनीचे शेअर्स 102 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर वाटप करण्यात आले होते. 9 एप्रिल 2021 रोजी हे शेअर्स 140 रुपयांच्या किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. जुलै 2022 मध्ये कंपनीने आपल्या भागधारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.12 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1724.05 रुपयांवर जाऊन बंद झाले होते.

या कंपनीच्या शेअर्स नी मागील 16 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या भागधारकांना तब्बल 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 49 लाखांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. 9 एप्रिल 2021 रोजी EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 140 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले होते. जर तुम्ही लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला EKI एनर्जी सर्व्हिसेसचे 714 शेअर्स मिळाले असते. EKI एनर्जीने जुलै 2022 मध्ये आपल्या भागधारकांना 3:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते. म्हणजेच ज्यांच्याकडे कंपनीचा 1 शेअर होता त्यांना कंपनीने 3 बोनस शेअर दिले होते. याचा अर्थ असा की लिस्टिंगच्या दिवशी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे सध्या कंपनीचे 2856 शेअर्स असतील. 12 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची जी किमत होती त्या नुसार, तुमच्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 49.23 लाख रुपये झाले असते.

बोनस शेअर्स :
पब्लिक इश्यूपूर्वी ते स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. EKI Energy च्या शेअर्सनी 24 जानेवारी 2022 रोजी बोनस शेअर जारी करण्यापूर्वी आपला 52 आठवड्याचा 12,599.95 रुपयांचा उच्चांक गाठला होता. EKI एनर्जी सर्व्हिसेसने एप्रिल-जून 2022 तिमाहीत एकूण 106.98 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने एकूण 508.12 कोटी रुपये महसूल कमावला होता. कंपनीचे बाजार भांडवल 4,740.45 कोटी रुपये असून, EKI एनर्जी भारतातील सर्वात मोठ्या कार्बन क्रेडिट डेव्हलपर आणि पुरवठादारांपैकी एक अग्रणी कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of EKI energy services share price return on 17 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)EKI ENERGY(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या