6 May 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

VIDEO | शिंदे गटाच्या सरकारचं काय चाललंय?, मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता सुद्धा त्याच प्रयत्नात

Maratha reservation

VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या छतावर चढले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून :
आज मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतलं. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मनाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी आहे. आज दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर विरोधकांनी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. ‘जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्याने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हात यामध्ये भाजला आहे, त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी अधिवेशनामध्ये माहिती दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Maratha Kranti Morcha supporter at Mantralaya terrace suicide attempt check details 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Ekanth Shinde(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x