19 May 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

शिंदेंच्या राजकीय कुरघोडीचा अतिरेक संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय | बाळासाहेबांना मुखाग्नी दिला त्याच शिवतीर्थावरील 'दसरा मेळावा' हायजॅकसाठी फिल्डिंग

Shivsena Dussehra Melava

Shivsena Dussehra Melava | मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यात राज्यात सत्ता सत्तापालट झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कुरघोडी करण्यात रमल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी ते भाजपच्या सल्ल्याने अतिशय खालच्या थरातील राजकारण करत असल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे म्हटलं की शिवतीर्थ आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीने स्व. बाळासाहेब ठाकरेंना मुखाग्नी दिला होता. आता त्याच ठिकाणावरील शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाच्या राजकीय कुरघोड्या सुरु झाल्याने समाज माध्यमांवर अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याला कारण शिंदे-फडणवीस सरकारचा दबाव असल्याचं म्हटलं जातंय.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. शिवसेना नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Dussehra Melava may hijacked by Eknath Shinde check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Dussehra Melava(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x