30 April 2025 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Netflix for Free | एअरटेल युजर्सना मिळणार फ्री नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन, जबरदस्त ऑफर जाणून घ्या

Netflix for Free

Netflix for Free | मोबाइल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाइल युजर्सना आता निवडक प्लानवर ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर फ्री अॅक्सेस मिळणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार सेवा कंपनी एअरटेलने ही खास ऑफर दिली आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना सबस्क्रिप्शन बेस्ड ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सची सेवा मोफत देऊ केली आहे. कंपनीकडून आपल्या काही निवडक प्लान्सवर ही फ्री सुविधा दिली जात आहे. सध्या एअरटेलसोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना दिलं जात आहे.

११९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानवर या सुविधा उपलब्ध :
एअरटेल आपल्या पोस्टपेड ग्राहकांना 1199 रुपयांच्या प्लानमध्ये रेग्युलर कनेक्शन आणि दोन अॅड-ऑन कनेक्शन ऑफर करत आहे. म्हणजेच या जोडणीअंतर्गत एक मूळ ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबातील आणखी दोन सदस्यांना तीन पोस्टपेड कनेक्शन्स मिळतात. या खास ऑफरच्या माध्यमातून आता तिन्ही लोक फ्री नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शनचा आनंद घेऊ शकतात. या प्लानमध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांना एक महिन्याच्या वैधतेसह 150 जीबी डेटा देत आहे. ज्यामध्ये डेटा रोलओवरची सुविधाही देण्यात येत आहे. म्हणजेच जर एका महिन्यात पूर्ण डेटा वापरला गेला नाही,

तर उर्वरित डेटा देखील पुढील महिन्यात वापरला जाऊ शकतो. म्हणजेच पहिल्या महिन्याचा संपूर्ण डेटा सेव्ह झाला तर पुढच्या महिन्यात 150 ऐवजी 300 जीबी डेटा उपलब्ध होईल. याशिवाय ११९९ रुपयांच्या प्लानमध्ये पोस्टपेड युजर्सव्यतिरिक्त अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस/ डे आणि नेटफ्लिक्स बेसिक यांनाही डिस्ने + हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

१५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानवर या सुविधा उपलब्ध आहेत :
एअरटेलच्या 1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये पोस्टपेड युजर्संना रोलओवरची सुविधा सोबत एक महिन्याच्या वैधतेसह 250 जीबी डेटा मिळत आहे. फ्री ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर यात नेटफ्लिक्सचे स्टँडर्ड सब्सक्रिप्शन मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस/ डे, डिस्ने + हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शनही या प्लानमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

नेटफ्लिक्स ही अमेरिकेची आघाडीची सबस्क्रिप्शन स्ट्रीमिंग सर्व्हिस आणि प्रोडक्शन कंपनी असून, तिचे भारतात चार प्रकारचे सबस्क्रिप्शन प्लॅन आहेत. मोबाइल, बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम असे हे प्लान्स आहेत. या प्रत्येक प्लानमध्ये व्हिडीओ क्वालिटी आणि अॅड-ऑन कनेक्शन स्क्रीनच्या सुविधेनुसार सब्सक्रिप्शन फी स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Netflix for Free for Airtel users check offer in details 31 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Netflix for Free(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या