4 May 2025 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Dance India Dance Video | डान्स इंडिया डान्स शोसाठी महेश बाबूने आकारले इतक्या कोटींचे मानधन, सुपरस्टारचा 'हा' अंदाज पहा

Dance India Dance

Dance India Dance Video | तेलुगू फिल्म स्टार महेश बाबू खास करून त्याच्या अ‍ॅक्टिंगने ओळखला जातो पण काही दिवसांपासून तो वेगवेगळ्या विधानांवरून चर्चेमध्ये येताना दिसून येत आहे. महेश बाबू तेलुगू डान्स रिअ‍ॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये त्याच्या मुली सोबत दिसून येणार आहे. दरम्यान डान्स इंडिया डान्सचा पुढील एपिसोड रविवार 4 ऑगस्ट रोजी झी तेलुगूवर प्रसारित करण्यात आला आहे. तर शोचा पुढील प्रोमो सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे ज्यात महेश बाबू आपल्या मुलीसोबत गाण्याच्या तालावर ठुमका लावताना दिसून येणार आहे. दरम्यान या शोमध्ये येण्यासाठी महेश बाबूने किती मानधन घेतले, ते खाली वाचूयात. वर वाचल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू त्याच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेमध्ये आला होता. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, बॉलीवूड त्याला अफोर्ड करू शकणार नाही.

महेश बाबू आणि सितारा स्टेजवर धरणार ताल :
दरम्यान, चॅनलने डान्स इंडिया डान्स शोचा नवीन प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने त्याच्या मुलीसोबत डान्स इंडिया डान्सच्या शोमध्ये ग्रँड एन्ट्री केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. महेश बाबूच्या एंट्रीने स्पर्धकांमधील उत्साह द्विगुणीत झाला आहे. चित्रपटामध्ये तर अभिनेता खास दिसतोच मात्र या शो दरम्यान देखील त्याचा खास अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

व्हिडिओवर चाहत्यांच्या खास प्रतिक्रिया :
सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आणि लिहिले की, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर महेश बाबू आपल्या मुलीला नाचताना पाहत आहे, हे चित्र खरोखरच अविस्मरणीय आहे. तर दुसऱ्या चाहत्याने लिहीले की, सुपरस्टारचे आपल्या मुलीबद्दलचे प्रेम अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. चाहते आता हा शो येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शोसाठी महेश बाबूने आकारले 9 कोटी :
माध्यमांनूसार, डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये येण्यासाठी सुपरस्टार महेश बाबूने झी तेलुगूसोबत 9 कोटींचा करार केला आहे. दरम्यान, आगामी चित्रपटांसाठी महेश बाबू काही प्रोजेक्टवर काम करताना देखील दिसून येत आहे. लवकरच दक्षिणात्य स्टार त्रिविक्रम श्रीनिवासनसोबत पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. दरम्यान, वडिलांच्या पाठोपाठ मुलगी सिताराने देखील टॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dance India Dance Superstar Mahesh Babu will be seen in show Checks details 1 September 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dance India Dance(1)Mahesh Babu(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या