8 May 2025 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Koffee With Karan 7 | लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 7' चॅट शोमध्ये इशान खट्टरचा अनन्या पांडे संदर्भात मोठा खुलासा

Koffee With Karan 7

Koffee With Karan 7 |  चाहत्यांचा सर्वात लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण 7’ जो एक चॅट शो आहे. दरम्यान, याचा पुढील एपिसोड आला आहे. यावेळी करण जोहरच्या शो मध्ये ‘फोन भूत’ची स्टार कास्ट दिसून येणार आहे. यामध्ये कतरिना कौफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर आपल्या आयुष्यातील लव्ह लाईफबद्दलचा खुसाला करणार आहेत.

कतरिनाने केला प्रेमाचा खुलासा
गेल्या 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सात फेरे घेतले आहेत. अनेकवेळा सोशल मीडियावर या जोडप्यांचे व्हायरल होत असलेले व्हिडीओ आणि इंस्टाग्रामवरील फोटोज बघत असतो. कायमच दोघे एकमेकांच्या मिठी मध्ये दिसून येतात तर यांचे रोमॅंटिक फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होतात. याआधी याच सीझन मध्ये विकी सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसून आला होता तर आता कतरिना या नवीन स्टार्स सोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉफी विथ करण 7 मध्ये आली आहे. या दरम्यान, तिघांनी आपल्या लव्ह लाईफ बद्दल मोठा खुलासा केला आहे.

अनन्या आणि मी आयुष्यभर चांगले मित्र राहू
शो दरम्यान, लव्ह लाईफ बद्दलच्या खुलाश्यामध्ये इशानने असे उत्तर दिले की, प्रश्न विचारणारा करण जोहर आणि प्रेक्षक अचंबित झाले. अनन्या पांडेचे नाव न घेता त्याने लव्ह लाईफचा खुलासा केला आहे. यावेळी इशान म्हणाला की, मी आणि अनन्या आयुष्यभर चांगले मित्र राहू, अशी आशा आहे. त्याने असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे, ‘खली पीली’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान ईशान आणि अनन्या यांच्यात जवळीक वाढली होती आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केले होते.

अनन्या आणि इशान एकत्र स्पॉट झाले होते
‘खली पीली’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान ईशान आणि अनन्या यांच्यात जवळीक वाढली होती आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केले होते. पापाराझींना दोघेही डेटींग दरम्यान एकत्र दिसून आले.

इशानचे आगामी चित्रपट
इशान लवकरच ‘पिप्पा’ चित्रपटात दिसून आहे. याशिवाय तो ‘फोन भूत’मध्ये कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Koffee With Karan 7 will feature Katrina Kaif, Siddhant Chaturvedi and Ishaan Khattar Checks details 9 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Koffee With Karan 7(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या