4 May 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

HDFC Mutual Fund | गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देत आहेत हे शेअर्स, फक्त 5 वर्षात 2 ते 2.5 पटीने रिटर्न

HDFC Mutual fund

HDFC Mutual Fund| HDFC लिमिटेड ही भारतातील आघाडीची आणि सर्वात मोठी वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड ही एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना राबवते. HDFC म्युच्युअल फंड ही भारतातील आघाडीच्या दिग्गज आणि लोकप्रिय म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय मानल्या जातात.

एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या काही योजना गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त परतावा देणाऱ्या ठरल्या आहेत. आणि फक्त मागील 5 वर्षांत या फंडने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2.5 पटीने वाढवले आहेत. जर तुम्ही मागील 5 वर्षांच्या परताव्याच्या चार्टवर नजर टाकली तर, वेगवेगळ्या योजनांनी किमान 20 टक्के वार्षिक परतावा दिलेला आपल्याला दिसेल. हा परतावा मुदत ठेवींच्या तुलनेत 3.5 पट अधिक जास्त आहे. या लेखात आम्ही तुम्हाला एचडीएफसी म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर केलेल्या काही सर्वोत्तम योजनांची माहिती देणार आहोत.

HDFC स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
HDFC स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 20 टक्के CAGR दराने परतावा मिळवून दिला आहे. येथे मागील 5 वर्षात 1 लाख रुपयेचे अडीच लाख रुपये झाले आहेत. तुम्ही या योजनेत किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. 31 ऑगस्टपर्यंत म्युचुअल फंड हाउसची एकूण मालमत्ता 12,913 कोटी होती.

HDFC लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडा :
HDFC लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के CAGR वर परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2 लाख रुपये परतावा मिळाला आहे. 31 ऑगस्ट रोजी या म्युचुअल फंड हाउसची एकूण मालमत्ता 2904 कोटी रुपये होती. तुम्ही या योजनेत किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के CAGR दराने परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मागील 5 वर्षात 2 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. 31 ऑगस्ट रोजी या फंड हाउसची एकूण मालमत्ता 30,949 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती. तुम्ही या योजनेत किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

HDFC लाँग टर्म अॅडव्हांटेज म्युचुअल फंड :
HDFC लाँग टर्म अॅडव्हांटेज म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के CAGR दराने परतावा मिळवून दिला आहे. तुम्ही या योजनेत किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. मागील 5 वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 2 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत या फंड हाउसची एकूण मालमत्ता 1363 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती.

HDFC टॉप 100 म्युचुअल फंड :
HDFC टॉप 100 म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12 टक्के CAGR दराने परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.80 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत तुम्ही किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. 31 ऑगस्ट रोजी या फंड हाउसची एकूण मालमत्ता 20,809 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual Fund Investments for long term benefits and return on 8 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या