3 May 2025 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या

PPF Investment

PPF Investment | तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी गुंतवणुकीचे काही मूलभूत नियम समजून घ्यावे लागेल. गुंतवणूकीचे नियम एकदा तुम्हाला समजले की, तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक ध्येये पूर्ण होतील आणि तुम्ही भविष्यात करोडोंचा रुपये कमवू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत या दोन्हीचा फायदा मिळतो. हमी पूर्ण परतावा देणारी ही गुंतवणूक योजना तुम्हाला 25 वर्षांत करोडपती बनवू शकते. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिला जाईल चला तर मग जाणून घेऊ सविस्तर

कर सवलतीचे फायदे :
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधील कर सवलत EEE च्या श्रेणीमध्ये गणली जाते. म्हणजेच तुम्हाला तुमच्या संपूर्ण गुंतवणुकीवर आणि परताव्यावर कर सवलतीचा लाभ दिला जाईल. गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिले जाईल आणि त्यावर तुम्हाला कोणताही कर आकारला जाणार नाही. पीपीएफमध्ये व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. परंतु, दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो. PPF खात्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाने, कर्ज किंवा इतर दायित्व असल्यास ते जप्त केले जाऊ शकत नाही.

सरकारी हमी योजना :
पीपीएफचे नियमन आणि संचालन भारत सरकार करते. याबाबतही सरकार हिताचे निर्णय घेते. त्यामुळे योजनेतील गुंतवणुकीवर सरकारी हमी देते. जर तुम्ही कर सवलत आणि भरघोस परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर, पीपीएफ ही सर्वोत्तम योजना आहे. PPF पेक्षा जास्त परतावा फक्त सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनेमध्येच उपलब्ध आहे. इतर कोणतीही योजना एवढं जास्त परतावा देत नाही.

किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये :
पीपीएफमध्ये सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.PPF खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुरू करता येते. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. PPF खाते उघडण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून सुरुवात करू शकता. PPF खाते सक्रिय ठेवण्यासाठी, प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करावे लागतील. एका आर्थिक वर्षात PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतील.

दरमहा गुंतवणुकीवर किती नफा?
जर तुम्हाला PPF मध्ये गुंतवणूक करून 1 कोटी रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 25 वर्षे नियमित 12,500 रुपये मासिक गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 81.76 लाख रुपये परतावा दिला जाईल. या मध्ये चक्रवाढ व्याजदर हा स्थिर म्हणजेच 7.1 टक्के राहील.

लॉक इन पीरियड पाच वर्ष :
तुम्ही पीपीएफ खाते उघडल्यापासून पाच वर्षांपर्यंत आपल्या खऱ्यातून पैसे काढू शकणार नाही. कारण, या योजनेत 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. फॉर्म नंबर 2 भरून पाच वर्षांनंतर तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. तथापि, 15 वर्षे कालावधी पूर्ण होण्या आधी जर तुम्ही पैसे काढले तर तुमच्या एकूण गुंतवणूक निधीतून 1 टक्के दंड शुल्क वजा केला जाईल. अंक उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल.

जमा रकमेवर कर्ज उपलब्ध :
पीपीएफ खात्यात जमा असलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. पीपीएफ खाते उघडल्यानंतर आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. PPF खाते सुरू केल्यानंतर 5 व्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल. समजा तुम्ही जानेवारी 2020 मध्ये PPF खाते उघडले आहेत, तर तुम्ही 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधी पर्यंतच कर्ज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या कमाल 25 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. पीपीएफवर जर तुम्ही कर्ज घेतले तर, PPF चा जो उपलब्ध व्याज दर आहे, त्यापेक्षा अधिक 1 टक्के व्याज तुमच्या कर्जावर आकारला जाईल. व्याज दोन मासिक हप्त्यांमध्ये किंवा एकावेळी एकरकमी व्याज रक्कम दिले जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Investment Scheme for Long term investment and Tax Benefits on 24 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या