8 May 2025 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

शिंदे गटाची पोलखोल गुजरात निवडणुक प्रचारात, महाराष्ट्रात भाजपने आमदार विकत घेतल्याचा केजरीवाल यांचा थेट प्रचार सभांमधून आरोप

Gujarat Assembly Election 2022

CM Arvind Kejrival | सध्या राज्यात ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सर्वत्र गाजत आहे. राज्यातील सत्तांतरा नंतर ‘गद्दार’ हा शब्द खूपच चर्चेत आला. त्यानंतर झालेल्या राज्याचा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करत सरकारला डिवचलं. त्यानतंर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गावो गावी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करताच उपस्थित जनसमुदाय ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करू लागतो.

गद्दार आणि 50 खोक्के एकदम ओके हे दोन शब्द राज्यात इतके चर्तेत आहेत की त्या नावाचा एका हॉटेल मालकाने चक्क आपल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीना ’40 गद्दार थाळी’ अशी नावं दिली आहेत. विशेष म्हणजे या थाळीची किंमतही त्यांनी तशीच ठेवली आहे. म्हणजे शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं होतं. त्यामुळे गद्दार व्हेज थाळीची किंमत 40 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 50 खोके घेतल्याचा आरोप असल्याने नॉनव्हेज थाळीची किंमत 50 रुपये इतकी ठेवली आहे.

चंद्र, सूर्य असेपर्यंत 50 खोके एकदम ओके हा वाक्प्रचार म्हटला जाईल. या आमदारांचे नातू देखील म्हणतील आजोबा 50 खोके एकदम ओके असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. मात्र आता विषय एवढ्यावरच थांबलेला नाही. शिंदे गटाने पैसे घेतल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळले असले तरी सामान्य लोकही हे मान्य करत नाहीत की पडद्यामागे एवढी मोठी राजकीय डील कोणताही आर्थिक व्यवहार न करता शक्य आहे. त्यामुळे शिंदे गटा संबंधित झालेला “50 खोके एकदम ओके” सध्या देशभरात चर्चेचा विषय झालेला असताना दुसऱ्या बाजूला हाच ‘राजकीय डीलचा’ मुद्दा गुजरात निवडणुकीच्या प्रचारात देखील समोर आणला गेला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुजरातमधील विधानसभेच्या अनुषंगाने करत असलेल्या अनेक सभांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने आमदारांची खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तसेच दिल्ली सारख्या छोट्या राज्यातही भाजपने आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी एका आमदारामागे २० कोटी ऍडव्हान्स देऊ केले होते असा आरोप थेट प्रचार सभांमध्ये करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात तो आकडा किती असू शकतो अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election 2022 Rally of Aam Aadmi Party Delhi CM Arvind Kejrival check details 29 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या