1 May 2025 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Electronics Mart India IPO | या IPO मध्ये गुंतवणूक करणार? शेअरची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक 20 रुपये प्रीमियमवर

Electronics Mart India IPO

Electronics Mart India IPO| शेअर बाजारातील गुंतवणूकदार बऱ्याच कालावधीपासून आपला नुकसान भरून काढण्याची वाट पाहत आहेत. आता गुंतवणूकदारांना जास्त वाट पाहण्याची गरज नाही कारण, आणखी एका कंपनीचा IPO शेअर बाजारात खुला होणार आहे. हा IPO आहे एका ग्राहक टिकाऊ रिटेल चेन “Electronics Mart India” म्हणजेच EMIL कंपनीचा. हा 500 कोटी रुपयांचा IPO मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर किंमत 56 ते 59 रुपये निश्चित केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ अजून खुला झाला नाही, पण कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रे मार्केट किंमत :
शेअर बाजारातील निरीक्षकाच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स गुरुवारी ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. 17 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील. जर या कंपनीचे शेअर्स अप्पर प्राइस बँडवर वितरण केले गेले तर शेअर ग्रे मार्केट प्रीमियम किमतीनुसार सूचीबद्ध केले जाऊ शकतात. तर या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 79 रुपये किमतीवर सूचीबद्ध केले जाऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे संपूर्ण भारतात 36 शहरांमध्ये एकूण 112 स्टोअर्स आणि आउटलेट सुरू आहेत.

IPO तपशील :
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या IPO मध्ये 500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स फ्रेश इश्यू असतील. ह्या IPO मध्ये ऑफर फॉर सेल जाहीर करण्यात आली नाही. या या कंपनीने आपल्या IPO कागदपत्रांच्या मसुद्यातस्पष्ट केले आहे की कंपनी IPO मधून मिळणाऱ्या फंडचा वापर भांडवली खर्च, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी करेल. या कंपनीची 90 टक्के पेक्षा अधिक कमाई रिटेल चेनच्या माध्यमातून होते. मोठ्या उपकरणांच्या विक्रीतून कंपनी आपल्या एकूण कमाईच्या 50 टक्केपेक्षा अधिक कमावते. आनंद राठी फर्म, IIFL सिक्युरिटीज आणि JM Financial ह्यांना या कंपनीच्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कंपनीबद्दल सविस्तर :
पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी Electronics Mart India /EMIL ही कंपनी सुरू केली होती. या ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे दुकान बजाज इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाखाली सुरू करण्यात आले होते. यासोबतच किचन स्टोरीजच्या नावाने 2 स्पेशलाइज्ड स्टोअर्स चालवले जातात. तसेच, ऑडिओ अँड बियोंड या नावानेही एक विशेष स्टोअर सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे हाय एंड होम ऑडिओ आणि होम ऑटोमेशन सोल्यूशन्स सुविधा पुरवली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Electronics Mart India IPO is trading on Premium price in gray Market on 30 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Electronics Mart India IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या