2 May 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे स्क्रिप्टेड 'राजकीय वरळी इव्हेन्ट' जोमात?, विषय होता काय आणि माध्यमांकडे मांडला कसा? - सविस्तर वृत्त

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुंबईतील वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांना याच मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचा बातम्या पेरल्या जातं असल्या तरी संपूर्ण वास्तव वेगळं आहे. २-३- दिवसांवर आलेल्या दसरा मेळाव्यापूर्वी ब्रेकिंग न्यूज पेरण्याची शिंदे गटाने योजना आखली आहे आणि त्यासाठी प्रथम आदित्य ठाकरेंना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. ‘५० खोके एकदम ओके’ ही टॅगलाईन राज्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी उचलून धरली आणि ती टॅगलाईन घराघरात पोहोचली आहे. तसेच काल २ दिवसांपूर्वी शिंदे गटातील नेत्यांनी स्वतःच्या मुलांची वर्णी लावून ‘युवा सेना’ पदाधिकाऱ्यांची नेमणूका जाहीर केल्या आहेत. काही क्षणातच ती ‘चिरंजीव सेना’ असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. आता राज्यातील युवासेनेवर ‘मानसिक राजकीय दबाव’ वाढवण्यासाठी वरळी मतदारसंघाच्या नावाने राजकीय पेरण्या सुरु केल्या आहेत.

आज मुंबईसह राज्यातील मनसे, राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेनेच्या शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश घडवून आणताना आणि ‘वृत्त पेरणी’ करताना युवा सेना आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात येतं आहे. शिंदे गटाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आमिष देऊन इतर पक्षातील छोटे कार्यकर्ते फोडून आणण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे. शिंदे गटातील मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यानुसार आजच्या वरळीच्या नावाने दिसणाऱ्या गर्दीत मनसे आणि राष्ट्रवादीचे छोटे कार्यकर्ते आणि शिंदे गटात असलेले असलेले पदाधिकारी मोठ्या प्रमाणात होते. या राजकीय इव्हेंटची जवाबदारी शिंदे गटातील प्रवक्ते किरण पावसकर यांना देण्यात आली होती. इतर गर्दीत प्रवेश करणाऱ्यांपेक्षा मागण्या घेऊन आलेल्या लोंकांचा जास्त भरणा होता अशी माहिती देण्यात आली. मनसे नेत्यांनी काल हरकत घेतल्यानंतर शिंदे गटाने ही युक्ती पुढे केल्याचं या पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे. विशेष म्हणजे मुंबईसह महाराष्ट्रात मनसेला भविष्य नसल्याचे सांगून शिंदे गटातील अनेक पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते फोडून शिंदे गटात घेऊन जातं आहेत. मात्र माध्यमांकडे युवा सेनेचा उल्लेख करत आहेत आणि परिणामी मनसेचे कार्यकर्ते या वृत्तावर आनंद व्यक्त करत आहेत. शिंदे गट स्क्रिप्टेड राजकारणात भाजपलाही तोडीस तोड आहे असं देखील यातून स्पष्ट होतंय.

किरण पावसकर यांना काय जवाबदारी :
किरण पावसकर हे शिवसेनेत कामगार सेनेचे महत्वाचे पदाधिकारी होते. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र ते राजकीय दृष्ट्या कुचकामी ठरले होते. त्यानंतर ते राजकारणात बाजूला झाले होते. मात्र शिंदे गटातील फुटीनंतर त्यांना संधी चालून येताच ते शिंदेंच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. त्यांनी वरळीतील निरनिरळ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत बैठका घेऊन त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वर्षावर घेऊन जाऊ असा विश्वास दिला होता. त्याच घटनेला शिस्तबद्धपने वरळी मतदारसंघाशी जोडून राजकीय इव्हेन्ट घडवण्यात आला.

वास्तविक या गर्दीत शिक्षक संघटना आणि इतर काही संघटना ज्या आपल्या मागण्या घेऊन आल्याहोत्या त्यांना प्रवेशाची गर्दी असं भासविण्यात आलं आहे. त्यामुळे दसरा मेळावा होई पर्यंत शिंदे गट असे इव्हेन्ट घडवून आणेल आणि त्यामागील उद्देश हा शिवसेनेवर मानसिक राजकीय दबाव निर्माण कारण हाच असेल हे स्पष्ट होतंय. मात्र हा खेळ सुप्रीम कोर्टाच्या १-२ सुनावण्या होईपर्यंत सुरु राहील आणि त्यानंतर गुळाला लागणारे मुंगळे गूळ संपताच पसार होतील असं कायदेतज्ज्ञ देखील सांगत आहेत. कारण अनेकदा मंत्रिपद भूषवणाऱ्या एकनाथ शिंदेंचे यापूर्वी जनतेला अशाप्रकारे भेटण्याचे व्हिडिओ महाराष्ट्राने पाहिले नव्हते आणि आता ते पाहायला मिळत आहेत यावरून सध्या इव्हेंटच्या राजकीय बाजार जोमात आहे असं म्हणावं लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Group political stunt before Dasara Melava check details 02 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या