50 Khoke Ekdam Ok | शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगतात
CM Eknath Shinde | शिवसेनेतले आमदार फुटले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून गद्दार संबोधलं गेलं. इतकंच नाही, तर ५० खोके घेतल्याचा आरोपही शिंदे गटातल्या आमदारांवर सातत्यानं होतोय.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आली. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार व्हायला एक महिना उशिर झाला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला होता. पण दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यामुळे सरकारवर वारंवार विरोधकांकडून निशाणा साधला जातोय.
विस्तार झाल्यास दुसऱ्याच दिवशी हे सरकार कोसळेल :
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झाला तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगत असल्याचा धक्कादायक दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा :
मंत्रीपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीय. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याचीवेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: 50 Khoke Ekdam Ok Eknath Khadse made allegation at Jalgaon check details 02 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा, यापूर्वी 1 वर्षात 351% परतावा दिला
- Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
- RVNL Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार
- Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
- Cashless Health Insurance | तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे? फक्त 3 तासात होणार कॅशलेस सेटलमेंट, नियम नोट करा
- Suzlon Share Price | स्टॉक प्राईस 45 रुपये, तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, रॉकेट स्पीडने परतावा मिळणार
- Income Tax on Salary | नोकरदारांनो! पॅन-आधार लिंक करा, अन्यथा दुप्पट इन्कम टॅक्स भरावा लागणार
- Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार
- LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट
- Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 30 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या