8 May 2025 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | या शेअरमध्ये 5 दिवस सतत तेजी, ब्रोकरेज फर्मला मल्टीबॅगर परताव्याची अपेक्षा, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Stock To Buy, coal india limited,

Stocks To Buy | भारतातील कोळसा क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कंपनी कोल इंडियामध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. ही कोळसा क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कोल इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढलेला दिसत आहे. 6 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली होती. काल कोल इंडिया कंपनीच्या शेअर मध्ये 4 टक्क्यांची उसळी दिसून आली आणि शेअरची किंमत 232.50 रुपयांवर गेली होती. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये कोल इंडियाचा स्टॉक आठ टक्क्यांहून जास्त वर गेला आहे.

या शेअरबाबत बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील काळात कोल इंडियाचा स्टॉक वाढू शकतो. अशा स्थितीत गुंतवणूकदार स्टॉक दीर्घकाळासाठी साठी होल्ड करू शकतात आणि पैसे वाढवू शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने कोल इंडिया कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया शेअरची लक्ष्य किंमत 294 रुपये निश्चित केली आहे.

वाढत्या कोळशाच्या उत्पादनामुळे कोल इंडियाने आपल्या उत्पादनातील वाढ कायम ठेवली आहे. यामुळेच ब्रोकरेज कंपन्या आणि गुंतवणूक तज्ञ कोल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर 5.1 टक्के पेक्षा अधिक म्हणजेच 1393 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले आहे.

त्याचवेळी मागील सहा महिन्यांतील कोल इंडिया कंपनीच्या उत्पादनावर नजर टाकली तर आपल्याला कळेल की एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीनं वार्षिक आधारावर 19.7 टक्के अधिक म्हणजे 2990 दशलक्ष टन कोळसा उत्पादन केले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने कोळसा काढण्याचे उत्पादन लक्ष्य 700 दशलक्ष टन पर्यंत वाढवले आहे.

ब्रोकरेज फर्मने दिला गुंतवणुकीचा सल्ला :
कोल इंडिया कंपनीची कामगिरी पहिली तर आपल्या लक्षात येईल की आपले देशांतर्गत कोळसा उत्पादन आणि मागणी चांगली राहील. आणि चालू आर्थिक वर्षात ई-लिलाव प्रीमियम जास्त राहील असा अंदाज ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात कोल इंडिया कंपनीसाठी स्टॉक व्हॉल्यूम आणि शेअरची किंमत दोन्ही सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे कंपनीला उत्पादन खर्च कपात करण्यास मदत होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने कोल इंडियाचे शेअर्स बिनधास्त खरेदी करून लक्ष किंमत स्पर्श करे पर्यंत होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

गुंतवणूकीची चांगली संधी :
मागील महिन्यात 8 सप्टेंबर 2022 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांक पातळीवर गेले होते. शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 241.85 रुपये होती. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढू लागल्याने शेअरची किंमत घसरली. शेअर बाजारातील तज्ज्ञ या पडझडीला एक सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. कोल इंडिया कंपनीच्या शेअरची लक्ष्य किमत 294 रुपये निश्चित करण्यात आली आहे, या किमतीनुसार गुंतवणूकदारांना पुढील काळात 27 टक्के चा परतावा होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy Coal India share has been recommended by experts for buying for new target price on 07 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या