4 May 2025 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Mulayam Singh Yadav | समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

Mulayam Singh Yadav passes away

Mulayam Singh Yadav | समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकसभेचे खासदार मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि २ ऑक्टोबरपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ते लाइफ सपोर्ट सिस्टिमवर होते. सध्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशातील सैफई येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुलायम सिंह यांची प्रकृती 2 ऑक्टोबरपासून चिंताजनक होती. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. रिपोर्टनुसार, त्यांची किडनीही नॉर्मल काम करत नव्हती. मुलायमसिंह हे बराच काळ आरोग्याच्या समस्येतून जात होते आणि या आधीही त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

अखिलेश यादव यांनी माहिती दिली :
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वत: मेदांता रुग्णालयात उपस्थित होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही त्यांनी ही माहिती दिली आहे. अखिलेश यांच्याआधी शिवपाल यादव आणि रामगोपाल यादव दिल्लीत उपस्थित होते. अखिलेश यांच्यासोबत त्यांची पत्नी डिंपल आणि मुलंही गुरुग्राममध्ये पोहोचली आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री :
२२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे जन्मलेले मुलायमसिंह यादव सुमारे सहा दशके सक्रिय राजकारणात होते. ते अनेक वेळा उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य होते. याशिवाय ते अनेक वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यादव 3 बार यूपी के मुख्यमंत्री रहे थे. त्याचबरोबर त्यांनी १९९६ मध्ये एचडी देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samajwadi Party supremo and former Uttar Pradesh CM Mulayam Singh Yadav passes away at the age of 82 check details 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mulayam Singh Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या