Mutual Funds | या म्युच्युअल फंडाची योजना कमी कालावधीत पैसा पटीने वाढवते आहे, भरघोस परतावा देणाऱ्या फंडाची योजना लक्षात ठेवा

Mutual Funds | म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा असा एक सोपा पर्याय आहे, ज्यात तुम्हाला फंड व्यवस्थापनाची चिंता करण्याची गरज नाही, आणि दीर्घकाळात तुम्ही म्युचुअल फंड गुंतवणुकीतून पैसे वाढवू शकता. म्युचुअल फंड बाजारात असे अनेक फंड उपलब्ध आहेत जे अल्पावधीत तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट वाढवू शकतात. आज आपलं अशाच एका म्युचुअल फंड माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव आहे “क्वांट म्युच्युअल फंड”. या म्युचुअल फंड योजने अंतर्गत 4 योजना वेगवेगळ्या योजना येतात. क्वांट टॅक्स प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह फंड, क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड. मागील 5 वर्षात भरघोस परतावा देण्याच्या बाबतीत क्वांट म्युचुअल फंड सर्वात पुढे आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 वर्षांत 20 टक्के CAGR/कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट परतावा कमावून दिला आहे.
म्युचुअल फंड परतावा :
गेल्या 5 वर्षांत क्वांट टॅक्स प्लॅनने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. Quant Small Cap Fund Growth ने पाच वर्षात 21.50 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. Quant Mid Cap Fund Growth Plan ने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षात 20 टक्के CAGR नफा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंड आणि गुंतवणूक बाजारातील तज्ञ यांनी सांगितले की क्वांट म्युच्युअल फंड हा सदाबहार म्हणजेच कधीही गुंतवणूक करू शकता असा इक्विटी म्युच्युअल फंड आहे. आणि त्याच्या 4 योजनांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात 20 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. याचा अर्थ या म्युचुअल फंडांनी फक्त 3.5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.
गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट टॅक्स प्लॅनमध्ये 1 लाख रुपये जमा केले असते, तर तुम्ही गुंतवणूक रक्कम आता दुप्पट झाली असती आणि तुम्हाला एकूण 2.71 लाख रुपये नफा झाला असता. जर तुम्ही क्वांट अॅक्टिव्ह फंडात 1 लाख गुंतवले असते तर, तुमचे गुंतवणूक मूल्य आज दुप्पट झाले असते. त्याच वेळी, क्वांट स्मॉल कॅप फंडात ज्या लोकांनी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांची गुंतवणूक रक्कम 5 वर्षात वाढून 2.60 लाख रुपये झाली. याशिवाय, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट मिड कॅप म्युचुअल फंडमध्ये 1 लाख रुपये जमा केले असते तर, तुमची गुंतवणूक रक्कम वाढून आता 2.55 लाख रुपये झाली असती.
गुंतवणूक करावी का?
क्वांट म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक बाजारातील जोखीम चांगल्या प्रकारे हाताळली आहे आणि त्याच वेळी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे कमालीचे वाढवले आहेत. या म्युचुअल फंडच्या माध्यमातून लोकांनी भरघोस पैसे कमावले आहेत. क्वांट म्युचुअल फंडचा जोखीम समायोजित परतावा खूप जास्त राहिला आहे. तसेच, या म्युचुअल फंडाने डाउनसाइड जोखीम चांगल्या प्रकारे हाताळली असल्याचे आपण चार्ट पॅटर्नवरून पाहू शकतो.म्युचुअल फंड बाजारातील तज्ञांचे स्पष्ट मत आहे की, गुंतवणूकदारांनी क्वांट म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणूक केले पाहिजे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Quant Mutual fund investment opportunities and return in long term on 10 October on 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH