3 May 2025 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Penny Stocks | याला म्हणतात आयुष्य बदलणारा शेअर, शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 16 कोटी झाले, स्टॉक नेम नोट करा

Penny stocks

Penny Stocks | Divi’s Laboratories Ltd कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून तिचे बाजार भांडवल 99,157.82 कोटी रुपये आहे. या कंपनीचा समावेश लार्ज-कॅप कंपनीच्या गटात होतो. Divi’s lab कंपनी शंभर पेक्षा जास्त देशांना आपले उत्पादन पुरवणारी API, इंटरमीडिएट आणि नोंदणीकृत स्टार्टिंग मटेरियलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी जगातील टॉप तीन API उत्पादकांपैकी एक असून भारतातील टॉप API फर्मपैकी एक आहे. Divi’s Laboratories ही एक कर्जमुक्त मल्टीबॅगर कंपनी आहे, जिने आपल्या अनेक गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. चला तर जाणून घेऊ थोडक्यात कसे या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले.

2003 सालापासून Divi’s Laboratories Ltd कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 41 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. Divi’s Laboratories Ltd चा शेअर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3,734 रुपये किमतीवर बंद झाला होता. काल स्टॉक मागील आठवड्याच्या ट्रेडिंग सेशन मधील 3,733 रुपये किमतीच्या तुलनेत 0.027 टक्के वाढला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मध्ये जवळपास 222,557 शेअर्सची खरेदी-विक्री पाहायला मिळाली होती. 13 मार्च 2003 रोजी या कंपनीचा स्टॉक 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 3,734 रुपये किमतीवर पोहोचला आहे. याचा अर्थ कंपनीने या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 41,388.89 टक्के परतावा कमावून दिला आहे.अर्थातच हा मल्टीबॅगर परतावा मानला जातो.

बोनस शेअर्स आणि परतावा :
कंपनीने दोन वेळा बोनस शेअर वितरीत करण्याची घोषणा केली होती. अशा मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अनेक गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुक करण्यास पसंती देतात. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास कोणत्याही स्टॉकमधून मोठा परतावा कमावता येतो. 2003 मध्ये डेव्हिस लॅब कंपनीचा शेअर फक्त 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर त्यावेळी तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला 11,111 शेअर्स मिळाले असते. 30 जुलै 2009 रोजी कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. बोनस शेअर्स जोडून तुमच्या सर्व शेअर्सची एकूण संख्या 22,222 शेअर्स झाली असती. 6 वर्षांनंतर, कंपनीने 23 जुलै 2015 रोजी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वितरीत केले होते. त्यावेळी 1: 1 या प्रमाणे 22,222 शेअर्स मध्ये बोनस शेअर्स जोडून एकूण शेअर्सची संख्या 44,444 इतकी झाली असती. याचा अर्थ सुरुवातीला 2003 मध्ये जी तुम्ही गुंतवणूक केली असती, तर सध्या तुमच्या शेअर्सच्या संख्येत चौपट वाढ झाली असती.

गुंतवणुकीवर एकूण परतावा :
2003 साली जर तुम्ही या स्टॉक मध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. एक लाख रुपयेवर 19 वर्षांत 16 कोटी परतावा कसा मिळाला? 2003 मध्ये डेव्हिस लॅब कंपनीत 9 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 11,111 शेअर्स मिळाले असते. या कंपनीने दोन वेळा गुंतवणूकदारांना 1:1 प्रमाणे बोनस शेअर्स वितरीत केले होते, ते जर जोडले तर एकूण शेअरची संख्या 44,444 शेअर होते. 2003 मध्ये 9 रुपयावर ट्रेड करणारा स्टॉक सध्या 3,734 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्याच्या बाजार भावानुसार 44,444 शेअर्सचे मूल्य 16.59 कोटी रुपये झाले असते. याचा अर्थ एक लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला दोन वेळा बोनस शेअर्स मिळाले असते, आणि सध्याच्या बाजार भावानुसार तुमच्या एक लाख गुंतवणुकीचे मूल्य 16 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Devis laboratory share price return in investment on 11 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या