3 May 2025 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Pan Card Update | ड्युअल पॅन कार्ड ठेवणे आहे बेकायदेशीर, काय होऊ शकतं ते इथे वाचा आणि योग्य पाऊल उचला

Double PAN Card

Pan Card Update |  सरकारी किंवा खाजगी कामांसाठी पॅन कार्ड हे सर्वांत महत्वाचे दस्ताऐवज आहे. कोणत्याही कामासाठी 10 अंकी पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. मात्र आता पॅन कार्डच्या काही नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत आणि ज्यांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तीकडे पॅन क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की, कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीकडे एकापेक्षा जास्त ड्युअल पॅन कार्ड असणे बेकायदेशीर आहे आणि यामध्ये पकडले गेल्यास आयकर विभाग कायदेशीर कारवाई करू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे दोन पॅन असल्यास, तुम्हाला अतिरिक्त पॅन सरेंडर करण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होते.

पॅन कार्ड कसे सरेंडर करावे
1. प्रथम tin-nsdl.com वेबसाईट वर जा आणि सर्व्हिस टॅब अंतर्गत पॅन वर क्लिक करा.
2. येथे ‘पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा’ अंतर्गत ‘अर्ज करा’ या वर क्लिक करा.
3. आता ‘अॅप्लिकेशन प्रकार’ अंतर्गत ‘विद्यमान पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा, पॅन कार्ड पुनर्मुद्रण पर्याय निवडा.
4. योग्य श्रेणी निवडा त्यानंतर विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून अटी व शर्तींना होकार द्या.
5. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि ‘सबमिट’ वरती क्लिक करा.
6. ‘कंटिन्यू विथ पॅन अॅप्लिकेशन फॉर्म’ वर क्लिक करा आणि तपशीलवार संपुर्ण तपशील भरून घ्या.
7. आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले छायाचित्र अपलोड करून पुढे पेमेंट करून घ्या.
8. आता तुम्हाला जो पॅन सरेंडर करायचा आहे त्याचा फॉर्ममध्ये उल्लेख करा.
9. ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून कागदपत्रे अपलोड करून पावती डाउनलोड करून तुमच्या जवळ ठेवा.
1. दोन पासपोर्ट आकाराच्या फोटोंसोबत Protean eGov Technologies Limited ला पावती पाठवा.

जेव्हा तुम्ही फॉर्म 49A भराल तेव्हा जवळच्या UTI किंवा Protean eGov Technologies Limited TIN सुविधा केंद्रात सबमिट करून एकाधिक पॅन सरेंडर करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Double PAN Card checks details 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Double PAN Card(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या