1 May 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Video Viral | 'फ्लाईंग कॅट' मांजरीचा बर्फाळ भागातील व्हिडीओ झाला व्हायरल, यूजर्स म्हणाले 'ती उडी मारण्याच्या नादात उडू लागली'

Cat Video Viral

Video Viral |  प्राण्यांबाबतचे कोणतेही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. दरम्यान, वन्यजीवांशी संबंधित एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांचा दिवसभराचा थकवा दूर होईल यामध्ये दुमत नाही. तसेच प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी ही भेट कमी नाहीये. या व्हिडीओमध्ये, एका मांजरीने गुरुत्वाकर्षणाचा पराभव केला आहे म्हटल तरी वावग ठरणार नाही.

वन्यजीव व्हिडीओ व्हायरल
IFS डॉ. सम्राट गोडा यांनी ट्विटरवर वन्यप्राण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बर्फाळ नदीवर मांजर उडी मारत आहे. मात्र ते ज्या पद्धतीने उडी मारत आहे ते पाहून कोणीही थक्क होईल. एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी मांजरीने अशा प्रकारे उडी मारली की काही वेळेसाठी असे वाटले की ती मांजर हवेमध्ये उडत आहे. त्या मांजराच्या उडीने लोकांना आणि इंटरनेटला प्रभावित केले.

मांजरीची उडी पाहण्यासारखी
एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी मांजरीने अशी उडी मारली आहे की, हा व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका बर्फाळ भागातून हवेमध्ये मांजर उडताना दिसत होते. जिथे नदीच्या डाव्या बाजूला बर्फाने झाकलेल्या छोट्याशा खडकावर मांजर बसले होते आणि तिथून ते उजव्या बाजूच्या खडकावर उडी मारते. त्या मांजरीने पूर्ण तयारीने इतक्या जोमाने उडी मारली की तिने एका झटक्यात ती लांब आणि रुंद नदी पार केली मात्र यादरम्यान मांजर उडी मारतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले, आणि ते खूपच सुंदर आहे. व्हिडिओ स्लो मोशनमध्ये कॅप्चर केला गेला ज्यामुळे व्हिडिओची गुणवत्ता आणखी वाढली जाईल.

मांजरीला फ्लाईंग कॅट म्हटलं तरी चालेल
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या मांजरीच्या व्हिडीओला यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. मांजराची ही उंच उडी लोकांना खूप आवडली आहे तसेच मांजरीच्या उडीपेक्षा कॅमेरामनची खासियत असल्याचेही अनेकांनी यावेळी स्पष्ट केले. ज्याने हा सुंदर क्षण टिपला आहे. तसेच, ही उडी स्लो मोशन मोडमध्ये आणखी चांगली करण्यात आली आहे काही युजर्सनी असेही सांगितले की, नदीच्या पाण्यामधून पळून जाण्यासाठी मांजरीने ज्या प्रकारे उंच उडी मारली आहे, त्यावरून असे दिसते की मांजरीला पाणी अजिबात आवडत नाही. व्हिडिओला 23,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of wild cat during jumping to another side check details 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Cat Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या