1 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Hotel Room Tips | हॉटेलमध्ये रूम बुक करताय, या वस्तू तुम्ही फुकट घरी घेऊन जाऊ शकता, त्यावर तुमचा अधिकार असतो

Hotel Room Tips

Hotel Room Tips | अनेक व्यक्ती विकएन्डला बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. अशात घरापासून दूर कुठे फिरायला गेले असता आराम करण्यासाठी हमखास हॉटेलमध्ये रुम बूक केली जाते. तसेच कामानिम्मित्त घरापासून दूर गेले असता घरी परतायला उशीर होणार असेल तेव्हा देखील आपण वास्तव्यासाठी हॉटेल रुमचा पर्याय निवडतो. जेव्हा आपण हॉटेलमध्ये एखादी रुम बूक करतो तेव्हा तेथील काही वस्तू या फक्त आपल्यासाठी असतात.

तुम्ही अनेकवेळा असे एकले असेल की, हॉटेलमध्ये रुम घेतल्यानंतर चेकआउट करताना अनेक व्यक्ती तेथील काही वस्तू चोरून घरी घेउन जातात. कोणी वीजेचे दिवे नेतात, तर काही महा नग हॉटेलमधील मग, टॉवेल, शोभेच्या वस्तू देखील घरी घेउन जातात. नक्कीच असे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे कधीच करू नका. मात्र हॉटेलमधील काही वस्तू अशा देखील आहेत ज्या तुमच्या मालकीच्या असतात.

हो हो हे खरे आहे. यात खोटे आणि चुकीचे तसेच फसवणूकीचे काहीच नाही. हॉटेलमधील रूमवर तुमच्या सेवेसाठी अनेक वस्तू ठेवलेल्या असतात. रूम सोडून गेल्यावर तुमच्या या वस्तू फेकूण दिल्या जातात. त्यामुळे त्या तुम्ही घरी घेउन आलात तरी काहीच हरकत नाही.

पिण्याच्या पाण्याची बॉटल
जेव्हा तुम्ही हॉटेलच्या रुमवर पिण्याचे पाणी मागवता तेव्हा ते तुमचे असते. हॉटेलमधून तुम्हाला ती सेवा पुरवली जाते. दररोज तुम्ही दोन पाण्याच्या बॉटल मागवू शकता. तसेच यातील पाणी उरले असेल तर चेकआउट करताना तुम्ही ते घरी घेउन जाउ शकता.

चहा आणि कॉफीचे किट
कामाच्या व्यापात स्वत: ला फ्रेश ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती सतत चहा किंवा कॉफी पित असतात. जेव्हा हे किट मागवले जाते तेव्हा त्यात मिल्क पावजर, साखरेचे क्यूब, दूध, टी बॅग अशा गोष्टी असतात. रूम खाली करताना तुम्ही या वस्तू घरी नेउ शकता.

शिवणकामाच्या वस्तू
काही हॉटेलमध्ये शिवणकामाचे किट देखील पुरवले जातात. यात सुई, धागा, बटणे अशा वस्तू असतात. त्यामुळे हॉटेलमध्ये तुम्हाला याची गरज पडली नाही तरी तुम्ही ते घरी नेउ शकता. मात्र जर हे किट हॉटेलच्या सेवे बाहेरील असेल तर तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतात.

मनोरंजनाच्या वस्तू
आता मनोरंजनात टिव्ही देखील येतो. तर टिव्ही घरी घेऊन येऊ शकतो की, काय असा विचार तुमच्या मनात आला असेल थांबा. कारण तसे तुम्ही करू शकत नाही. अनेक व्यक्तींना मनोरंजन म्हणून वाचनाची आवड असते. यात कवीता, जोक, कथा अशा अनेक पुस्तकांचा समावेश असतो. त्यामुळे हॉटेलचे नियम पाहून तुम्ही पुस्तके घरी आणू शकता.

सौंदर्य प्रसादने
प्रत्येक हॉटेलमध्ये बॉडी लोशन, इअरबड्स, शेव्हिंग ऍक्सेसरीज, बाथरूम स्लीपर, कंडिशनर, शॉवर कॅप, कॉटन पॅड्स, साबण, शॅम्पू अशा अनेक वस्तू ठेवलेल्या असतात. तुम्हीजर या अर्धवट वापरल्या तर उरलेल्या वस्तू फेकूण दिल्या जातात. त्यामुळे तुम्ही त्या घरी घेउन येऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hotel tip bring these items home for free you do n0t have to pay at the hotel 15 October 2022.

हॅशटॅग्स

Hotel Room Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x