7 May 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Business Idea | फक्त 850 रुपयांमध्ये सुरु करा स्वतः चा व्यवसाय, स्वतःच लोकल ब्रँड बनवूनही मोठी कमाई करू शकता

Business idea

Business Idea | पैसे कमवून मोठं काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मात्र फक्त छोट्याश्या नोकरीत ते शक्य नसतं. आपल्या महाराष्ट्रात अनेक फेरीवाले छोटे मोठे व्यावसायिक आहेत. यात जास्त करून गुजराती आणि मावडी व्यवसाय करताना दिसतात. मात्र आपला मराठी माणूस देखील छोट्या व्यवसायातून सुरुवात करून मोठा उद्योगपती बनू शकतो. आता तुम्हाला देखील स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे जेमतेम पैसे आहेत तर तुमच्यासाठी आम्ही एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

भांडवलाचा मोठा प्रश्न असतो :
व्यवसाय सुरू करताना नेहमी भांडवलाचा मोठा प्रश्न असतो. त्यानंतर नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा हा प्रश्न देखील असतो. सुरुवात करताना अनेकजण सध्या आणि कमी खर्चिक कोणता व्यवसाय आहे का हे शोधतात. आम्ही देखील असाच एक व्यवसाय शोधला आहे. ज्यासाठी तुम्हाला खूप मोठी जागा देखील लागणार नाही. हा व्यवसाय आहे चविष्ट बटाटे वेफर्सचा. यात तुम्हाला खूप कमी जागेत आणि पैशात व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कोरोना महामारीने सगळ्यांचा व्यवसायाचे महत्व पटले आहे. तर हा व्यवसाय सुरू करण्यातही तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज पडेल हे जाणून घेऊ.

या वस्तू आवश्यक
बटाटे वेफर्स उपवासा पासून ते अगदी टाईमपास म्हणून देखील सर्व जण चवीने खातात. यासाठी तुम्हाला एक मशीन खरेदी करावे लागेल. ज्याची किंमत केवळ 850 रुपये आहे. ही मशीन तुम्हाला सहज कोठेही उपलब्ध होईल. तसेच यासाठी विजेची देखील गरज नाही. मशीन ऑनलाईन देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही मशीन अगदीच आकाराने छोटी असल्याने तुम्हाला एखादा मोठा गाळा घेण्याची देखील गरज नाही. यात तुम्ही बटाटे तुम्हाला हव्या त्या आकारात सुंदर कापू शकता. ही मशीन हाताळायला देखील सहज सोपी आहे.

मशीनसाठी एकूण किती गुंतवणूक करावी लागेल
यात मशीनसाठी तुम्हाला 850 रुपये लागतील. तसेच बटाटे आणि इतर किरकोळ गोष्टीसाठी तुम्हाला 100 ते 200 रुपये लागतील. यात जेमतेम 1200 पर्यंत खर्च येईल. मशीन लहान असल्याने तुम्ही ती एखाद्या हातगाडीवर किंवा एखाद्या दुकान मालकाच्या परवानगीने दुकाना बाहेर छोट्या जागेत देखील व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही यात जास्त मेहनत घेतली तर तुम्हाला यातून जास्त फायदा मिळेल. स्वच्छ आणि ग्राहकांसमोर वेफर्स बनवल्याने त्यांना देखील तुमच्यावर विश्वास बसेल.

यात तुम्ही तुमच्या सोई नुसार अधिक नावीन्य वाढवू शकता. त्यासाठी फक्त मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. तुमचा व्यवसाय अधिक चांगला चालवा यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता. सोशल मीडियाचा माध्यमातून आज अनेक व्यवसाय मोठी मजल मारत आहेत. तुमच्या पदार्थाची चव खाद्य प्रेमींना आवडली तर आरामात दिवसाला तुम्ही 2000 रुपये कमवू शकाल.

या व्यवसायात तुम्हाला 7 पटीने जास्त कमाई करता येईल. समजा तुम्ही दिवसाला 10 किलो बटाटा वेफर्स विकले तर एका दिवसाला 1000 रुपये अगदी सहज मिळतील. कोणताही व्यवसाय करताना त्यात असणारी रिस्क पाहूनच पाऊल ठेवावे. कारण व्यवसाय नवीन असल्यास तो दणाणून चालेलच असे नाही. मात्र जर तुम्ही हार न मानता त्यात सातत्य ठेवले तर पैसे कमविण्यासाठी तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Business Idea start with just a little money and become an entrepreneur 15 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Business ideas(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या