3 May 2025 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Video Viral | भला मोठा सुरा घेऊन बँकेत घुसलेल्या गुंडाला मर्दानी महिला बॅंक मॅनेजर अशी बिनधास्त नडली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video

Video Viral | सोशल मीडियावर आपण अनेकदा बँक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, राजस्थानच्या श्रीगंगानगर भागातील बँक लुटल्याची घटना समोर आली आहे, तसेच तेथील चोरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, काही दरोडेखोर मरुथरा बँकेमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसले आहेत पण त्यांना तिथे एक ‘रिव्हॉल्व्हर राणी’ भेटली आणि त्यांचा प्लॅन फासला. या ‘रिव्हॉल्व्हर क्वीन’कडे रिव्हॉल्व्हर प्लस होते म्हणायला हरकत नाही. ही महिला दुसरी तुसरी कोणी नसून बँकेची मॅनेजर आहे जिने एवढे शौर्य दाखवले की आता सगळेच तिच्या शहाणपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहे. चोर चाकूचा धाक दाखवत होते पण ते बँक मॅनेजर पूनम गुप्ता यांना घाबरवू शकले नाहीत कारण पूनम गुप्ता सशस्त्र दरोडेखोराचा धैर्याने सामना करताना या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येते. या गोंधळादरम्यान बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही चोरट्याला पकडून बाहेर काढले आहे.

‘रिव्हॉल्व्हर राणी’ बनली बॅंक मॅनेजर
व्हिडीओजर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हातामध्ये प्लाझ्मा घेऊन बँक मॅनेजरने या दरोडेखोराचा निडरपणे सामना केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा दरोडेखोर पूनम गुप्ता यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा मॅनेजर पूनम त्याच्या हातावर प्लाझ्माने वार करायला सुरुवात करते. तसेच या महिलेच्या धाडसासमोर शस्त्रधारी चोराचेही धीर सुटले म्हमायला हरकत नाही. बँक मॅनेजर पूनम यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरोडेखोर पकडले गेले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स महिलेचे भरभरून कौतुक करत आहेत, तर बँकेमध्ये दरोडेखोर घुसल्याने अनेकजण बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
माध्यमांच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता घडली होती आणि हा दरोडेखोर बँकेमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना सर्व पैसे बॅगेत भरण्यास सांगत असल्याचे कर्मचाऱ्यांनी चौकशी दरम्यान सांगितले आहे. तसेच यावेळी बँकेमध्ये सुमारे 35 लाख रुपयांची रोकड जमा होती, आणि ती या बँक महिलेच्या धाडसामुळे चोरीला गेली नाही. तसेच श्रीगंगानगर येथील मीरा चौकी परिसरात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Story woman Bank Manager Fight Robber Video trending on social media checks details 24 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या