1 June 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket | सीझनमध्ये अवघड आहे! अशी करा तिकीट बुकिंग, 'कन्फर्म' होईपर्यंत पैसे देण्याचीही गरज नाही Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजनांमध्ये 460% पर्यंत मल्टिबॅगर परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 01 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा
x

Income Certificate | उत्पन्नाचा दाखला कसा मिळवतात?, माहिती ठेवा अन्यथा आयत्यावेळी खूप अडचणी येतील

Income Certificate

Income Certificate | राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेताना आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासत असते. अनेक शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना याची हमखास गरज पडते. जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या वार्षिक फी शुल्कात सवलत हवी असते तेव्हा स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला फार गरजेचा असतो. त्यामुळे आज या बातमीमधून उत्पन्नाचा दाखला कसा मिळवायचा या विषयी जाणून घेऊ.

हा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातील तहसील कार्यालयातून एक फॉर्म भरावा लागतो. यावेळी त्यांनी मागितलेले सर्व दस्तऐवज तेथे सबमिट करावे लागतात. फॉर्म सबमिट केल्यावर पुढील 2 आठवड्याच्या कालावधीत तुमचा उत्पन्नाचा दाखला तयार होतो.

यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धत देखील निवडू शकता. त्यासाठी शासकीय https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेत स्थळावर भेट द्यावी. तेथे सर्व माहितीची पूर्तता केल्यास तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दिला जातो. यावेळी तुम्ही ऑनलाईन केलेला अर्ज हा तहसील मधील क्लर्कच्या हाती जातो. नंतर नायब तहसीलदार तुमचे कागदपत्र तपासतो आणि दाखल्याला संमती देतो.

तुमच्या गावी सेतू किंवा महा ई सेवा केंद्र असल्यास तुम्ही तेथूनही हा दाखला मिळवू शकता. दिलेल्या सर्व ठिकाणांपैकी तुमच्या सोईच्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून उत्पन्नाचा दाखला मिळवू शकता. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, मतदार ओळखत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी एक ओळखपत्र असावे. हे फक्त शासकीय सेवांमध्ये तुम्ही आहात हे सांगता.

तसेच तुमचा राहता पत्ता तपासण्यासाठी आधारकार्ड, ओळखपत्र, रशकर्ड, वीजबिल, पणीबिल, 7/12 अशा कागदपत्रांची गरज असते. तुम्हाला जर वैद्यकीय कारणासाठी हा दाखला हवा असेल तर डॉक्टरांकडून मिळणारे पात्र या अर्जाला जोडणे बंधनकारक आहे. तसेच महाविद्यालयीन कामासाठी हवे असल्यास बोनाफाईड जोडणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | How to get Income Certificate check details 19 October 2022.

हॅशटॅग्स

Income Certificate(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x