6 May 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
x

Money From IPO | 50% प्रिमियमवर लिस्टिंग झालेला स्टॉक 2 दिवसांपासून 10% अप्पर सर्किटवर, स्टॉक पाहा आणि पैसे लावा

IPO Investment

Money From IPO | बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सुरू झालेली रिटेल चेन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया ही शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स मागील 2 दिवसांपासून 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 59 रुपयांच्या किंमत बँडवर शेअरचे वाटप केले. 19 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 102.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

EMI कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
17 ऑक्टोबर 2022 रोजी Electronics Mart India कंपनीचे शेअर्स 53 टक्के प्रीमियमसह 90 रुपये किमतीवर NSE वर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 59 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स BSE वर 52 टक्केच्या प्रीमियम किमतीसह 89.40 रुपयेवर सूचीबद्ध झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीने पब्लिक ऑफरद्वारे 755 कोटी रुपये उभारले. या कंपनीचा आयपीओ 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आणि IPO 71.93 पट अधिक सबस्क्राइब झाला.

शेअर्समधील वाढ :
Electronics Mart India कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 2 दिवसात 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स सलग 2 दिवस 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी पडझड दिसून आली होती,पण मागील दोन दिवसांपासून हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. स्टॉक दोन दिवसात 84.45 रुपयांवरून 102.10 रुपयांपर्यंत वाढ आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO मधील QIB गुंतवणूकदारांचा कोटा 169.54 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, HNI आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा अनुक्रमे 63.59 पट आणि 19.72 पट सबस्क्राईब झाला होता. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 83.20 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO Investment of Electronics Mart India Share price return after listing on stock market on 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या