3 May 2025 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर पोस्टाची ही नविन स्कीम एकदा पाहाच, पैसा वाढणं महत्वाचं

Post Office Scheme

Post Office Scheme |  सध्याच्या धावपळीच्या जिवणात प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी सुरक्षित मार्गाच्या शोधात आहे. आपण आणि आपले कुटूंब सध्या जरी आर्थिक विवंचनेत नसले तरी कालंतराने भविष्यात कोणते संकट येणार आहे याची कुणाला जाणिव नसते. त्यामुळे याच काळात संरक्षणासाठी अनेक जण वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. त्यातील पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूका सर्वात उत्तम माणल्या जातात.

नुकतीच पोस्टाने टाइम डिपॉझिट ही योजना आणली आहे. ही योजना तुमच्या बॅंकेतील एफडी प्रमाणे काम करते. या योजनेत शासनाने नुकतीच व्याजाच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ ३० आधार अंकांनी केलेली आहे. म्हणजेच यात गुंतवणूक करणा-या व्यक्तीला ६.७ टक्के या दराने व्याज मिळणार आहे. या योजनेची खासियत अशी आहे की, ही एफडी प्रमाणे असून तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करू शकता. यात १ वर्षापासून ते ५ वर्षामर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

योजनेसाठी कोण आहे पात्र
पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेत भारतातील कोणताही नागरीक खाते उघडू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इतकेच नाही तर गुंतवणूकीसाठी संयुक्त खात्याची देखील सोय आहे. यात एकाच वेळी तीन व्यक्ती यात खाते खोलू शकतात. तुमच्या १० वर्षांपेक्षा मोठ्या मुलाच्या नावे देखील या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. यात अगदी १००० रुपयांच्या गुंतवणूकीपासून तुम्हाला बचतीसाठी सुरूवात करता येते.

६.७ टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज
या योजनेत वेगवेगळ्यासेच कालावधी नुसार व्याजाचे दर आकारण्यात आले आहेत. जर पाच वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ६.७ टक्के या दराने व्याज मिळेल. तीन वर्षांसाठी ५.८ आणि दोन वर्षांसाठी ५.७ तर एका वर्षासाठी या योजनेत ५.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. व्याजाची  हे दर त्या त्या कालावधीनुसार निश्चित करण्यात आले आहेत.

टॅक्स भरण्यापासून होईल सुटका
यात जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला टॅक्स पासून सुटका मिळेल. कोणतेही इनकम टॅक्स तुम्हाला भरण्याची गरज पडणार नाही. कलम १९६१ च्या सेक्शन ८० क नुसार हा फायदा होईल. तसेच मॅच्युरीटी पुर्ण होण्याआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर त्यावर दंड आकारण्यात येईल. यासह टॅक्सची पासून मिळणारी सुटका फक्त पाच वर्षांच्या योजनेसाठीच आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme If you want to get maximum profit then you must check this new scheme of post 01 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या