1 June 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Double Line on Cheque | बँक चेकच्या डाव्या कोपऱ्यातील त्या 2 ओळी, पण अनेकांना त्याबद्दल 'ही' माहितीच नाही LIC Policy Surrender | पगारदारांसाठी गुड-न्यूज! LIC पॉलिसी सरेंडर करून 48 तासांत पैसे मिळणार, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा SJVN Share Price | SJVN स्टॉक ना ओव्हर बॉट, ना ओव्हर सोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 25 शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हिट, संधी सोडू नका
x

शेतकऱ्यांची कर्जमाफी... ती बँकच अस्तित्वात नाही? शिंदे-फडणवीस सरकारची शरद पवारांकडून पोलखोल

Sharad Pawar

NCP President Sharad Pawar | राज्यात सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी प्रचंड संकटात आहेत. त्यामुळे काल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्य सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण ढवळून निघालं आहे.

राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना “अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी अशी विरोधकांनी मागली केली आहे आणि त्यासाठी राज्य सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे-भाजपा सरकारची पोलखोल केली आहे.

भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, भू-विकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती.

राज्य सरकारने भू-विकास बँकेचे कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. २५ ते ३० वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. ‘लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं’ असं भाजपावल्याचं काम आहे,” अशी अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sharad Pawar exposed Shinde Fadnavis government over Bhu Vikas Bank farmer loan waiver check details 24 October 2022.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x