8 May 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला मत म्हणजे भाजपाला मत कँपेन बुमरँग, नोटाची एकूण मतं पाहून भाजपचा राष्ट्रीय पोपट होणार

Andheri East by poll assembly election 2022

Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण १० फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. शिवसेनेनं आरोपही केला होता की, नोटाला पसंती देण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. अजून निकाल बाकी आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या १०व्या फेरीमध्ये ३७,४६९ प्लस मत घेऊन आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे एकूण मतांची टक्केवारी पाहता सर्वाधिक मतांची मोठी टक्केवारी शिवसेनेच्या उमेदवार ऋतूजा लटकेंना मिळाली आहे.

स्थानिक भाजप नेत्यांचं नोटासाठी विशेष कॅम्पेन :
या निवडणुकीत स्थानिक भाजप नेत्यांनी नोटासाठी विशेष कॅम्पेन राबवल्याचे पुरावे समोर आले होते. अगदी गुजराती भाषेत विशेष बॅनर बनवून अंधेरी पूर्वेमधील गुजराती मतदारांना आवाहन करण्यात आलं होतं. मात्र गुजराती मतदारांनी देखील भाजपच्या या कॅम्पेनकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. मात्र मुरजी पटेल यांच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना मतदार केंद्रावर न्हेत नोटाचं बटण दाबण्यास सांगितलं असं स्थानिक पातळीवर वृत्त प्राप्त झालं आहे. यामध्ये सामान्य मतदारांचा काहीच संबंध नाही आणि इथला सामान्य मतदारांनी 32 टक्के मतदान केलं असलं तरी त्यात सर्वाधिक मतदार हा ऋतुजा लटके यांना मतदान करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे आकडेवारी सांगते आहे. मात्र नोटाला मत म्हणजे मुरजी काकाला मत असं कॅम्पेन राबवून देखील भाजाप उमेदवाराचा नोटा आकडेवारीतून राष्ट्रीय पोपट झाल्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East by poll assembly election 2022 vote counting check details 06 November 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x