17 June 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Sanjay Raut | संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर, PMLA कोर्टाची ईडीबाबत मोठी टिपणी, ईडीने मर्जीने आरोपी निवडले

Sanjay Raut

Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व राज्यसभा खासदार यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी, अशी याचिता ईडीकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. अनेक वेळी जामीन नामंजूर झाल्यानंतर आज अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.

संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध करत ईडीने जामीनाला स्थगिती देण्यात यावी, अशी एक याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती. यावर दुपारी ३ वाजता सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने ही स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.

PMLA कोर्टाची ईडी’बाबत गंभीर टिपणी
संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याची टिपणी PMLA कोर्टाने त्यांच्या आदेशात केल्याने तो ईडीबाबत मोठी धक्का असल्याचं म्हटलं जातंय. तसेच ईडीने मर्जीने आरोपी निवडले असं देखील कोर्टाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे हा ईडीला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. तसेच मुंबई हायकोर्टाने उद्या सुनावणी घेण्याचे म्हटले आहे.

ईडी वेगात उच्च न्यायालयात
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जोपर्यंत मुंबई हायकोर्टाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत राऊतांनी पूर्ण लढाई जिंकलीय असं म्हणता येणार नाही. संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. पण ईडीने राऊतांच्या जामीनाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय.

उच्च न्यायालयाने नकार दिला
खासदार संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राऊत यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी 7 वाजता राऊत यांची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sanjay Raut PMLA court slams ED over arrest of MP Sanjay Raut check details here 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x