7 May 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभेची आज उमेदवारी जाहीर होणार?

NCP, Sharad Pawar

पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी येथे आज सायंकाळी एनसीपीच्या पक्षाचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेल्या अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे मेळावे घेऊन जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीने पक्षातील आणखी एक इच्छुक विलास लांडे यांच्या समर्थकांत अस्वस्था पसरली आहे. त्यामुळे कोल्हे यांची उमेदवारी आजच जाहीर होणार की लांडे यांची समजूत काढून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार हे आज स्पष्ट होईल.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज सायंकाळी भोसरीतील ‘गावजत्रा मैदान’ जाहीर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या साडेचार वर्षांत महाराष्ट्र सरकार आणि ४ वर्षे १० महिने केंद्र सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास पूर्ण पणे अपयशी ठरले आहे. सन २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने देशातील जाहिरनामातून अनेक आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर ते आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोफ आज धडाडणार आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x