4 May 2025 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Money From IPO | बाब्बो! या शेअरने फक्त दीड वर्षात पैसा 25 पट वाढले, आता गुंतवणूक करावी का? वाचा डिटेल

Money From IPO

Money From IPO| प्रत्येक गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळवण्याची अपेक्षा ठेवून पैसे लावतो. एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याचा उद्देश्य चांगला नफा कमावणे हा असतो. आज या लेखात आपण अशाच एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर प्रॉफिट कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, तिचे नाव आहे,”Knowledge Marine & Engineering Works Ltd”.

Knowledge Marine & Engineering Works Ltd कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने प्रती शेअर किंमत 37 रुपये असेल असे जाहीर केले होते. सध्या या कंपनीचे शेअर 918 रुपये किमतीत ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील दीड वर्षात या कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांनी एका शेअरवर 811 रुपयांचा नफा कमावला आहे. हा कंपनीचा मल्टीबॅगर स्टॉक सध्या प्रेफरेंशियल शेअर्सच्या इश्यूसाठी बातमीत आला आहे. या कंपनीने स्टॉक मार्केट एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांनी नुकताच पार पडलेल्या बैठकीत 700 रुपये प्रति शेअर किमतीचे प्रेफरेंस शेअर्स इश्यू करण्यास मान्यता दिली आहे. गुंतवणुकदारांना हे शेअर्स 23 टक्के सवलतीने खरेदी करता येणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति शेअर 218 रुपयेचा फायदा होणार आहे.

स्टॉकचा इतिहास :
2022 या वर्षात Knowledge Marine & Engineering कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर काही काळापूर्वी 150 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 918 रुपयांवर ट्रेड करत आहे. 2022 या वर्षात Knowledge Marine & Engineering Works Ltd कंपनीच्या शेअरची किंमत 500 टक्क्यांनी वधारली आहे. या SME इंडेक्समधील कंपनीच्या शेअर्समध्ये मागील वर्षभरात 700 टक्क्यांची अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 25 पट अधिक वाढले आहे.

प्रेफरेंस शेअर्स म्हणजे काय ? :
कंपनी हे प्रेफरेंस शेअर्स आपल्या कंपनीतील निवडक गुंतवणूकदार आणि प्रमोटरला जारी करते. जेव्हा कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असते तेव्हा ज्या लोकांकडे प्रेफरेंस शेअर्स असतात, त्या गुंतवणूकदारांना पैसे दिले जातात. याशिवाय प्रेफरेंस शेअर्स होल्डर्सला कंपनी लाभांश देण्यातही प्राधान्य देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Knowledge Marine and Engineering share price return on investment on 17 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या