3 May 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Ashok Mochi | अशोक मोची! गुजरात दंगलीत गाजलेला चेहरा, मोदींच्या फेक गुजरात मॉडेलची पोलखोल करतोय, पहा व्हिडिओ

Ashok Mochi

Ashok Mochi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसेलही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आक्रमणामुळे अचानक काँग्रेसच्या या पदयात्रेला राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारयुद्धात मोठा मुद्दा वाटू लागला आहे. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या निवडणूक सभांमध्ये पदयात्रेला लक्ष्य केले, त्यानंतर काँग्रेसला त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेबाबत केलेल्या वक्तव्यांना त्यांच्या ‘निराशेचा’ परिणाम म्हणून संबोधत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेवर केलेल्या राजकीय हल्ल्यांना खुद्द राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक सभांमध्ये कोणतेही थेट उत्तर दिले नाही.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतली. गांधीनगरमधील भाजपचे राज्य मुख्यालय असलेल्या ‘श्री कमलम’मध्ये ही बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना विजयाचा मंत्र दिला, असं मानलं जातंय. या बैठकीला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते, अशी माहिती पक्षाचे नेते अनिल पटेल यांनी पत्रकारांना दिली. पंतप्रधानांनी नेत्यांशी पूर्णपणे अनौपचारिक पद्धतीने संवाद साधला आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले.

कट्टर हिंदू सुद्धा मोदी आणि भाजप विरोधात ?
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीच्या काळात एक फोटो सगळीकडे छापून आला. फोटोत एक व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन दोन्ही हात उंचावून आक्रमक भाव देताना दिसत आहे. त्या व्यक्तीचं नाव अशोक मोची. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अशोक मोची पुन्हा चर्चेत आलेत. अशोक मोचींनी थेट गुजरात मॉडेलवरून नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केलीये.

गुजरात दंगलीदरम्यानच्या फोटोमुळे प्रसिद्ध झालेल्या अशोक मोचीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीये. या मुलाखतीत बोलताना अशोक मोची गुजरात मॉडेलवरून सरकारवर टीका करत आहेत. नरेंद्र मोदींवरही त्यांनी भूमिका मांडलीये. हा व्हिडीओ काँग्रेसच्या नेत्यांकडून ट्विटर शेअर करण्यात आलाय. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्हींनीही हा व्हिडीओ शेअर केलाय.

अशोक मोची मुलाखतीत काय म्हणाले
“गुजरात मॉडेल तीन लोकांसाठी वाईट आहे, गरिबांसाठी, दलितांसाठी, मुस्लिमांसाठी, पीडितांसाठी. दुसऱ्यांसाठी चांगलं असेल, तर ते मला माहिती नाही. अदानी, अंबानींसाठी चांगलं असेल. जातीवाद्यांसाठी, भ्रष्टाचाऱ्यांसाठी चांगलं असेल, पण, चार लोकांसाठी गुजरात मॉडेल फेल आहे. माझ्यासाठी गुजरात मॉडेल फेल आहे”, असं अशोक मोची म्हणत आहेत.

ज्या व्यक्तीचा फोटो देश-विदेशात, डॉक्युमेटरींमध्ये, मीडियामध्ये, पुस्तकांमध्ये दाखवली जाते, तोच व्यक्ती इथं राहतोय, याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा मोदींची मुलाखत घ्यायला जाल, तेव्हा मोदींना विचारा की, अशोक मोची फूटपाथवर राहतोय. ते हिंदुत्वाचा चेहरा आहेत. ते हिंदूत्वाचे नेते आहेत, तर अशोक मोची इथे का राहतोय?”, असंही अशोक मोची म्हणताहेत.

मोदी किंवा भाजपकडून ऑफर आली तर
मोदी किंवा भाजपकडून ऑफर आली, तर जाणार का? या प्रश्नावर अशोक मोची म्हणतात, “मोदींनी गुजरातच्या गादीवर 13 वर्ष राज्य केलं. मोदी इथून तिथे गेलेत. तिथून इथे आलेले नाहीत. गुजरातमधून दिल्लीत गेलेत. निवडणुकीच्या काळात दर्यापूर, शहापूरमध्ये आलेत. आजपर्यंत मोदी इथे आलेले नाहीत”, असं उत्तर अशोक मोचींनी दिलं. मला भेटायला ना मोदी आले, ना त्यांच्या पक्षाचं कुणी. त्याच्या पक्षात जे दलित समाजातील आहेत, तेही आले नाही”, अशोक मोची म्हणत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ashok Mochi exposing Gujarat Model during Gujarat Assembly Election 2022 video trending check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Ashok Mochi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x