मुंबई : लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तब्बल २५ जाहीर सभा होणार आहे. त्यापैकीच ही एक जाहीर संयुक्त सभा असणार आहे. महाराष्ट्र चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
यातील एका टप्प्या अगोदर ही सभा घेतली जाणार आहे. या सभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि बिहारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित असणार असे सांगितले जात आहे. या सभेला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
