4 May 2025 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

PPF Scheme | पोस्ट ऑफिसची योजना करोडपती बनवू शकते, 417 रुपयाच्या बचतीतून 1 कोटी परतावा, डिटेल वाचा

PPF Scheme

PPF Scheme | आपण सर्व आपल्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक तडजोड करून बचत करत असतो. मात्र पण बऱ्याच लोकांना गुंतवणूक कशी करावी? गुंतवणूक केल्याने आपली बचत रक्कम अनेक पटींनी वाढू शकते, हे माहीत असूनही लोक गुंतवणूक करत नाही, कारण त्यांना गुंतवणूक करायची कुठे? हे माहीतच नसते. सुरक्षित गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक सरकारी योजनांचा समावेश होतो. भारत सरकार गुंतवणूकदारांसाठी अनेक योजना राबवते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे अनेक पट वाढवू शकतात. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा अल्प गुंतवणूक करून मोठा परतावा कमवू शकता. या योजनेचे नाव आहे, PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना. जर तुम्ही या योजनेत दररोज 417 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 1 कोटी रुपये परतावा सहज मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ या योजनेची पूर्ण माहिती.

गुंतवणुकीवर परतावा आणि व्याजदर :
PPF योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. एवढेच नाही तर ही योजना तुम्हाला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा देते. PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही हा कालावधी दर 5-5 वर्षानी वाढवू शकत. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर भारत सरकार सुरक्षा हमी देते.

मॅच्युरिटीवर मिळवा एक कोटी :
PPF योजनेत गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर 1 कोटी रुपये परतावा मिळवायचा असेल तर योजनेतील परताव्याचे गणित समजून घ्या. एक कोटी रुपये परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला यात वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्हाला 12500 रुपये मासिक म्हणजेच रोज 417 रुपये जमा रकावे लागतील. जर तुम्ही 15 वर्षे नियमित गुंतवणुक करत राहिलात तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 22.50 लाख रुपये जमा होईल. आणि त्यावर परिपक्वतेच्या वेळी तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ पद्धतीने 18.18 लाख रुपये व्याज परतावा मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. जेव्हा तुमच्या योजनेचा परिपक्वता कालावधी पूर्ण होईल, यानंतर तुमच्याकडे 5 वर्ष मुदतवाढीचा पर्याय उपलब्ध असेल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी PPF योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले, तर तुमच्याकडे 66 लाख रुपयांचा तयार झाला असेल, आणि आणखी 5 वर्ष कालावधी वाढवल्यास म्हणजेच 25 वर्षांनंतर या गुंतवणूक रकमेवर तुम्हाला एक कोटी रुपये रक्कम मिळेल.

PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत देखील मिळेल. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून हमखास परतावा मिळवू शकता. यासोबतच तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील मिळेल. जर तुम्हाला PPF खाते उघडायचे असेल तर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने खाते उघडू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for Long term investment and benefits on scheme on 24 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या