3 May 2025 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Sterling Tools Share Price | अबब! करोडपती बनवणारा शेअर, फक्त 82,000 गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, खरेदी करणार?

Sterling Tools Share Price

Sterling Tools Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीचा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. दीर्घकाळ पैसे लावून शेअर बाजारातून तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. आज या लेखात आपण अशा एका शेअर बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत 82000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरबद्दल अधिक तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sterling Tools Share Price | Sterling Tools Stock Price | BSE 530759 | NSE STERTOOLS)

स्टर्लिंग टूल्स लिमिटेड :
स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअरने 19 सप्टेंबर 2003 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 12221.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. बीएसई इंडेक्सवर 19 जानेवारी 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 1.09 टक्के कमजोरीसह 346.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 122 पट पेक्षा अधिक वाढवले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 81967 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपयेपेक्षा अधिक झाले आहेत.

1 वर्षातील पैसे दुप्पट :
स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या स्टॉकने महील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. 24 जानेवारी 2022 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 99.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 जानेवारी 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 177.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 346.50 रुपयेवर पोहचली आहे. या एक वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. ज्या लोकांनी एक वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 2 लाख रुपये झाले आहे.

2023 या नवीन वर्षात परतावा :
स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या स्टॉकने 2023 या नवीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतवा कमावून दिला आहे. 02 जानेवारी 2023 रोजी पासून आतापर्यंत या स्टॉकने लोकांचे पैसे 33 टक्के वाढवले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर स्टॉकची किंमत 266.35 रुपये होती. मात्र आता स्टॉक 346.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. इतक्या कमी कालावधीत या स्टॉक ने गुंतवणुकदारांना 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
1988 साली स्टर्लिंग टूल्स कंपनीची स्थापना कर्नाटक राज्यात करण्यात आली होती. शीट मेटल असेंब्ली मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची निर्मिती करणारी ही आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीने सुरुवातीला आपल्या प्रादेशिक ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आणि नंतर त्याचे लक्ष मोठ्या OE वर वळवले. स्थानिक आणि जागतिक ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने पुरवून कंपनीने जागतिक पातळीवर तसेच देशात आपल्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 39.74 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 178.6 कोटी रुपये कमाई केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 64.93 टक्क्यांच्या वाढीसह 16.6 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीचा निव्वळ प्रॉफिट मार्जिन 18.02 टक्क्यांच्या वाढीसह 9.3 टक्केवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling Tools Share Price 530759 STERTOOLS stock market live on 24 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या