1 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

ITC Share Price | आयटीसी कंपनीला जबरदस्त तिमाही नफा, शेअर तेजीत, अनेक ब्रोकरेज फर्मने दिली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा

ITC share price

ITC Share Price | ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीच्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. तिमाही निकालानंतर आयटीसी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 388.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर क्लोज झाले होते. आता विविध ब्रोकरेज फर्मने आयटीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 374.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)

नोमुरा :
सर्व विभागांमध्ये आयटीसी लिमिटेडचा मजबूत व्यवसाय वाढण्याची अपेक्षा आहे. आयटीसी कंपनी FMCG, हॉटेल इत्यादी व्यवसायात सुधारणा आणि चांगली कामगिरी करताना दिसत आहे. ब्रोकरेज फर्मने आयटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची नवीन लक्ष्य किंमत 455 रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी लक्ष किंमत 440 रुपये होती, ज्यात 15 रुपये वाढ करण्यात आली आहे.

जेएम फायनान्शिअल :
या ब्रोकरेज फर्मने आयटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 440 रुपये ही लक्ष्य किंमत जाहीर कली आहे. सोबतच ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

मॉर्गन स्टॅनली :
या ब्रोकरेज फर्मने आयटीसी कंपनीचे तिमाही पाहून 415 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले आहे. आयटीसी कंपनीच्या तिमाही निकालाने तज्ञांना ही विचार करण्यास भाग पाडले आहे.

नुवामा :
या ब्रोकरेज फर्मने आयटीसी कंपनी पुढील काळात बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तिमाही निकाल विचारात घेत तज्ञांनी आयटीसी कंपनीच्या शेअरवर 450 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

मोतीलाल ओसवाल :
या ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, आयटीसी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्यास मोठा वाव आहे. म्हणून तज्ञांनी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर्स 450 रुपये लक्ष्य किंमतसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

तिमाही निकाल जाहीर :
डिसेंबर तिमाहीत ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 23.09 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 5,070.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत ITC कंपनीने 4,118.80 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 3.56 टक्क्यांच्या वाढीसह 19,020.65 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 18,365.80 कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च 3.29 टक्क्यांच्या घसरणीसह 12,772.27 कोटी रुपये झाला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा खर्च 13,207.28 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITC Share Price 500875 stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#ITC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x