4 May 2025 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

Patanjali Foods Share Price | पतंजली फूड्स शेअर्स तेजीत, स्टॉकमध्ये खरेदी वाढतेय, फायद्याचं कारण जाणून घ्या

Patanjali Foods Share Price

Patanjali Foods Share Price | योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के वाढीसह 950.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या शेअर्सने इंट्रा डे ट्रेडमध्ये 865 रुपये नीचांकी किंमत पातळी स्पर्श केली होती. नंतर तळापासून स्टॉकमध्ये 10 टक्के रिकव्हरी पाहायला मिळाली होती. दुपारनंतर शेअरची किंमत 5 टक्क्यांच्या वाढीसह 948.90 रुपयांवर पोहोचले होते. योगगुरू बाबा रामदेव समर्थित पतंजली फूड FMCG कंपनीचे शेअर्स स्टॉक 24 जानेवारी 2023 रोजी 1,206.45 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि स्टॉक 22 टक्क्यांनी घसरला होता. 22 सप्टेंबर 2022 रोजी पतंजली कंपनीच्या शेअरने 1,495 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Patanjali Foods Share Price | Patanjali Foods Stock Price | BSE 500368 | NSE PATANJALI)

3 वर्षात दिलेला परतावा :
‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 20 टक्क्यांनी घसरली आहे. मागील तीन महिन्यांत स्टॉकमध्ये 31.10 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 11.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत पतंजली कंपनीच्या शेअरची किंमत 3511.54 टक्क्यांनी वधारली आहे.

पतंजली फूड तिमाही निकाल :
‘पतंजली फूड्स’ लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीत 269.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीचे तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मधील तिमाहीत कंपनीने 234.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या मार्जिनमध्ये घट झाल्याने शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अलीकडील काळात कंपनीच्या शेअरने खराब कामगिरी केली, कारण 1 एप्रिलपासून टॅरिफ रेट कोटा अंतर्गत क्रूड सोयाबीन तेलाची आयात थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला, याचा नकारात्मक परिणाम शेअरवर पाहायला मिळत आहे. पतंजली फूड्स कंपनीचे नाव पूर्वी ‘रुची सोया इंडस्ट्रीज’ होते. ही एक वैविध्यपूर्ण फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स आणि फास्ट मूव्हिंग हेल्थ गुड्स फोकस कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patanjali Foods Share Price 500368 stock market live on 07 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Patanjali Foods Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या