3 May 2025 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअर 145% इतका मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो, ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईस

Zomato Share price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप कंपनी ‘झोमॅटो’ चे शेअर विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 53.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. झोमॅटो कंपनीने 9 फेब्रुवारी 2023 रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत झोमॅटो कंपनीच्या तोट्यात 5 पट वाढ झाली असून कंपनीला 343 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 75 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीचा महसूल 1,112 कोटी रुपयांवरून वाढून 1,948 कोटी रुपयांवर गेला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या विक्रमी उच्चांकावरून 70 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी शेअरची किंमत आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 20 टक्के खाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

जेएम फायनान्शिअलने दिली लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियलने झोमॅटो कंपनीच्या स्टॉक खरेदीसाठी लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 126 रुपयांवर जाऊ शकतात. सध्याच्या किंमतीनुसार शेअर 145 टक्के वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते. झोमॅटोचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले असल्याची माहिती ब्रोकरेज फर्मने दिली आहे. 3Q मध्ये समायोजित EBITDA तोटा 265 कोटीवर आला आहे, तर फर्मने 280 कोटी रुपयेचा अंदाज लावला होता. कंपनीने मजबूत महसूल संकलन केले आहे, आणि त्यात अपेक्षेपेक्षा 6 टक्के अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा मार्जिन अन्न वितरण/ डिलिव्हरी व्यापारात अनुक्रमे +5.1%/ -4.5% आहे, जे अपेक्षेपेक्षा चांगले आहे.

जागतिक ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅन्लेने झोमॅटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी त्यांनी 82 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. गोल्डमन सॅक्सनेही गुंतवणुकीचा सल्ला कायम ठेवला आहे आणि स्टॉकवर प्रति शेअर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. नोमुरानेही स्टॉकवर 50 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे, जेफरीजने 100 रुपये लक्ष किंमत दिली आहे.

शेअर 70 टक्के कमजोर :
23 जुलै 2021 रोजी झोमॅटो कंपनीचे स्टॉक सूचीबद्ध करण्यात आले. कंपनीने IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 76 रुपये निश्चित केली होती. त्यावेळी स्टॉक वाढीसह 115 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी झोमॅटो शेअरची किंमत 66 टक्क्यांनी वाढून 126 रुपयांवर क्लोज झाली होती, आणि त्यानंतर शेअरने 169 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. सध्या शेअरची किंमत 51 रुपयेच्या जवळ ट्रेड करत आहे. म्हणजे IPO किमतीच्या तुलनेत शेअर सध्या 20 टक्के खाली ट्रेड करत आहे. त्याच वेळी झोमॅटो स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या तुलनेत 70 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 11 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या