Sintex Industries Stock Price | मुकेश अंबानी 'ही' कंपनी विकत घेणार, शेअर 2 रुपयांवर पोहोचला, पुढे काय?
Sintex Industries Share Price | ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या वस्त्रोद्योगातील कर्जबाजारी कंपनीचे नशीब फलफळले आहे. मुकेश अंबानी ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करत आहेत. NCLT ने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांच्या संयुक्त बोलीला मान्यता दिली आहे. शुक्रवारी NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने एक आदेश जाहीर केला त्यात त्यांनी, RIL आणि ACRE द्वारे सादर केलेल्या कर्ज निराकरण ऑफरला मान्यता दिली आहे. Reliance आणि ACRE कडून देण्यात आलेल्या ऑफरमध्ये शेअर भांडवलात कपात आणि शून्य मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे डिलिस्टिंग यांचा समावेश आहे. लेखी आदेश प्राप्त झाल्यावर ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीकडून अधिक माहिती प्राप्त होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार RIL आणि ACRE ने संयुक्तपणे 3,650 कोटी रुपयांची लोन सेटलमेंट ऑफर दिली होती. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ ला कर्ज देणाऱ्यांनी RIL आणि ACRE यांनी जाहीर केलेल्या संयुक्त बोलीच्या बाजूने कल दिला दिला होता. मागील वर्षी मार्च 2021 मध्ये या कंपनीसाठी निश्चित करण्यात आलेले रिझोल्यूशन अंतिम मंजुरीसाठी एनसीएलटीकडे पाठवण्यात आले होते.
‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या कर्जबाजारी कंपनी विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया मागील वर्षी एप्रिल 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती. या कंपनीवर 7,500 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून कंपनी कर्ज फेडू न शकल्याने कंपनीचे कर्जदार NCLT मध्ये गेले. त्यात कंपनीची नीलामी सुरू झाली आणि त्यात वेलस्पन ग्रुपची फर्म इझींगो टेक्सटाइल, जीएचसीएल आणि हिमसिका व्हेंचर्स यांनी देखील मोठी बोली लावली होती.
शेअरची किंमत :
सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी BSE निर्देशांकावर ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2.30 रुपये किमतीवर आहेत. स्टॉक मध्ये सध्या ट्रेडिंग थांबली आहे. कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ब्लॉक झाले आहेत.
शेअरची 52 आठवड्यांची कामगिरी
सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा शेअर सध्या २.३० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. तर या शेअरची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 11.45 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 69.13 टक्क्यांची घसरण झाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sintex Industries Share Price 502742 stock market live on 13 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY