16 May 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू बुलेट ट्रेनच्या तेजीत, अप्पर सर्किट हिट, शेअर्स खरेदीला तुफान गर्दी - NSE: RVNL Tata Motors Share Price | तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा शेअर? रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | पीएसयू शेअर्समध्ये 2.79 टक्क्यांची तेजी, मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करा, अपडेट आली - NSE: IREDA CDSL Share Price | मल्टिबॅगर सीडीएसएल शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा Suzlon Share Price | 23 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, फायदा घ्या, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 802% परतावा, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Lemon Tree Hotels Share Price | कंपनीचं नाव लेमन ट्री, पण शेअर ठरेल पैशाचं झाड, 70 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पहा

Lemon Tree Hotels Share Price

Lemon Tree Hotels Share Price | ‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीने नुकताच ‘लेमन ट्री हॉटेल’ या ब्रँड नावा अंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे 34 खोल्यांच्या हॉटेल फ्रँचायझी करारावर स्वाक्षरी केली आहे. हे नवीन हॉटेल जून 2023 पर्यंत कार्यान्वित होईल. मागील एका वर्षभरात या हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 73.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Lemon Tree Hotels Share Price | Lemon Tree Hotels Stock Price | BSE 541233 | NSE LEMONTREE)

व्यवसायबद्दल खास माहिती :
‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीने आपल्या प्रमुख पोर्टफोलिओ अंतर्गत येणाऱ्या सर्व हॉटेल्सचे नूतनीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये 300 दशलक्ष रुपये खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे कंपनी आपल्या हॉटेल रूम्सचे सरासरी भाडे 4,500 रुपयेपेक्षा जास्त वाढवू शकते. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने प्रति उपलब्ध रुम 3,879 रुपये कमाई केली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनाने उच्च व्याप्ती आणि ARR यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत मार्जिन चांगले राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा जास्त EBITDA मार्जिनसह, दरवर्षी 20 टक्क्यांनी महसूल वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचा PAT पुढील तिमाहीत 40 ते 50 टक्के वाढण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्मने व्यक्त केलेल्या अपेक्षा :
1) कंपनीचा व्यवसाय लवचिक मागणी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्री-कोविड पातळीला स्पर्श करेल.
2) ARR मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
3) व्यवस्थापन करारांतर्गत हॉटेल्सचा व्यवसाय अधिक वाढेल.

शेअरची लक्ष्य किंमत :
HDFC सिक्युरिटीज फर्म लेमन ट्री कंपनीच्या स्टॉकसाठी प्रति शेअर 108.00 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञ 108 रुपये लक्ष्य किंमतीसाठी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने लेमन ट्री कंपनीच्या शेअरवर 115.00 रुपये लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे. तर ICICI सिक्युरिटीज फर्मने लेमन ट्री कंपनीच्या शेअरवर 125.00 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली असून त्यावर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lemon Tree Hotels Share Price 541233 LEMONTREE stock market live on 27 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lemon Tree Hotels Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या