6 May 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली

Shivsena, BJP

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.

एकूण ७ मतदारसंघात महाराष्ट्र इलेक्शन वॉच अ‍ॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्सनं ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केलं. त्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ३३ टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. त्यांची मालमत्ता सरासरी दोन कोटी ३५ लाख रूपये आहे. १९ उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दहा गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.

एडीआरच्या अहवालामध्ये ११५ पैकी ३३ उमेदवार कोट्याधीश असल्याचं म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातील ११५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.३५ कोटी रूपये आहे. तर, भारतीय जनता पक्षाच्या ५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता १८.९९ कोटी रूपये तर, शिवसेनेच्या २ खासदारांची सरासरी मालमत्ता ९.६२ कोटी रूपये आहे. यामध्ये १० उमेदवारांनी आपले पॅन घोषित केलेले नाही. तर, ११५ पैकी ११ उमेदवारांनी उत्पन्नाचे स्त्रोत घोषित केलेले नाहीत. दरम्यान, प्रतिज्ञापत्रामध्ये ४८ उमेदवारांनी प्राप्तिकर विवरण घोषित केलेले नाही. या अहवालानुसार विद्यमान सहा खासदारांची २०१४ची मालमत्ता ५.३७ कोटी रूपये आहे. तर, २०१९मधील त्यांची मालमत्ता ही ८.५७ कोटी रूपये आहे. सारी आकडेवारी पाहिल्यानंतर शिवसेना – भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी साठ टक्के वाढ झाली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संपत्तीवरून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी ही आकडेवारी समोर आली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x